"माणसं" थांबली पण अवैध धंदे करणारे "सैतान" मोकाट

उंब्रजला अत्यावश्यक सेवांसाठी येणारी माणसे थांबली पण अवैध व्यवसाय करणारांच्या गाड्या घरपोच अवैध माल देण्यासाठी पळत असल्याने माणस थांबली पण सिगारेट, तंबाखु,गुटखा दारू इत्यादी अवैध मार्गाने खेडोपाड्यात घरपोच करणारे "सैतान"कसे काय मोकाट आहेत याबाबत लोकांच्यात चर्चा आहे.

उंब्रज/प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन विभाग झोपला असून उंब्रज पोलिसांनी दोन कारवाया करीत पकडलेली दारूचे पुढे काय झाले याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोयिस्करपणे डोळे झाकून निपचित पडला आहे का ! अशी चर्चा लोकांच्यात दबक्या आवाजात आहे.हा दारूचा माल कोठून आला ? कोणी दिला ? अजून कोणाला दिलाय ? याबाबत बॅच नंबरवरून ठावठिकाणा लावण्यात दारूबंदी विभाग का शांत बसला आहे हे न उलगडणारे कोडे असून यामागे फार मोठे अर्थकारण लपले असून गोरगरीब लाठ्या काठ्या खाऊन घरात आणि दोन नंबरवाले दुप्पट तिप्पट लूट करीत गावागावात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकांनी सांगितलेले काळ्या बाजारातील वस्तूंचे दर

इब्राहिम बाबा २० मूळ किंमत ०७
गाय छाप  २५      मूळ किंमत  १०
गोल्ड फ्लॅक मोठा ४० छोटा ३० मूळ किंमत १७ व १२
देशी दारू       २५० मूळ किंमत ५२
इंग्रजी दारू     ६०० मूळ किंमत  १५०