आयुक्त दिलीप ढोले यांनी कट कारस्थान करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करा....!

बारामती तालुक्यातील (वंजारवाडी ) च्या भगवान चौधर यांची पोलीस निरीक्षक सीबीडी बेलापूर यांच्या कडे लेखी तक्रार....!!

आयुक्त दिलीप ढोले यांनी कट कारस्थान करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करा....!

बारामती/प्रतिनिधी:-

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील रहिवाशी व तत्कालीन मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त  दिलीप पोपट ढोले, नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता दिलीप ढोले, श्रीमंत पोपट ढोले, हर्षवर्धन नारायण खाडे या सर्वांनी कट कारस्थान करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवासी भगवान संभाजी चौधरी यांनी सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे नवी मुंबई यांच्याकडे दि.०२/०८/२०२३ रोजी केली आहे.

सविस्तर माहिती अशी की भगवान संभाजी चौधर हे बारामती तालुक्यातील वंजारवाडी या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील संभाजी सोपान चौधर,आई द्वारकाबाई संभाजी चौधर, पत्नी शुभांगी भगवान चौधर, मुलगा आरव हे सर्वजण एकाच कुटुंबात राहत आहेत. त्यांचे वडील शेती करतात तर भगवान संभाजी चौधर हे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत.

त्यांनी तक्रारी अर्जामध्ये असे नमूद केले आहे की दिलीप ढोले यांचे कुटुंब हे आमचे नातेवाईक असून ते आणि आम्ही मिळून बारामती परिसरात काही बांधकाम प्रकल्प एकत्रित करत आहोत. त्या सर्व प्रकल्पांमध्ये त्यांनी मला व माझ्या कुटुंबियांना मुद्दाम अडकून ठेवल्याने माझे संपूर्ण करिअर धोक्यात आले आहे. सध्या मी आर्थिक कोंडीत अडकलो आहे. त्यामुळे ढोले कुटुंबीय व आमच्या मध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यासंदर्भात तोड-जोड करण्यासाठी आमच्यातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आयुक्त दिलीप ढोले आणि अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी आम्हाला सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथील हॉटेल के स्टार येथे मीटिंगसाठी मध्यस्थी विनोद चौधर व गोरख चौधरी यांच्या माध्यमातून बोलवून घेतले होते.

 

धमकी देताना दिलीप ढोले यांच्या तोंडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख...!!

ज्या वेळी आयुक्त दिलीप ढोले हे  मला दम दाटी करत होते. त्यावेळी मी काही वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खाजगी सचिव म्हणून काम केले आहे. असे सतत मला सांगत होते आणि त्याचवेळी त्यांच्या तोंडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आणि उल्लेख सतत करत होते.

भगवान चौधरी
तक्रारदार

त्या मीटिंगसाठी माझे वडील, आई, लहान भाऊ, लहान चुलते व त्यांची पत्नी ऐवढे जण उपस्थित होतो. तर ढोले कुटुंबाकडून स्वतः दिलीप ढोले, सुजाता ढोले, श्रीमंत ढोले, चित्रलेखा ढोले, हर्षवर्धन खाडे, पौर्णिमा खाडे उपस्थित होते. मीटिंग सुरू असताना दिलीप ढोले व माझ्यामध्ये शाब्दिक वाद सुरू होता. त्या दरम्यानच्याकाळात आयुक्त दिलीप ढोले यांनी मला मी आयुक्ता असल्याचा दम देत तुला व तुझ्या कुटुंबाला गुंडांकडून संपवून टाकण्यास वेळ लागणार नाही अशी धमकी दिली आहे. तसेच तुझे बारामती मधील प्रोजेक्ट चालू देणार नाही म्हणत तुझ्या धाकट्या भावाची पोलिसाची नोकरी घालून टाकेन असाही दम दिला गेला आहे असे तक्रारी अर्जात म्हटले आहे.

पुढे म्हटले आहे की या सर्व गोष्टीमुळे आमच्या मध्ये जोरदार वाद सुरू झाला त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत असलेले पोलीस अंगरक्षक बढे या माझ्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. त्या आदेशामुळे बडे हे माझ्या दिशेने धावून येऊन माझ्यावरती पिस्तूल रोखून धरण्याचा प्रयत्न केला. त्यांना माझ्या धाकट्या भावाने अडवून तुम्हाला पिस्तूल रोखता येणार नाही अशी म्हटल्यावर बडे माघारी फिरले. या सर्व अचानक घडलेल्या गोंधळामुळे मी आणि माझे आई-वडील फार घाबरून गेलो आणि मला त्या मीटिंग मधून घरच्या लोकांनी बाहेर आणले. त्यामुळे दिलीप ढोले सुजाता ढोले श्रीमंत ढोले चित्रलेखा ढोले हर्षवर्धन खाडे व पौर्णिमा खाडे यांच्याविरुद्ध कट कारस्थान करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारी अर्जातून भगवान चौधरी यांनी पोलीस निरीक्षक सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे केली आहे.