फलटण तालुक्यात २० लोकांचे रिपोर्ट आले कोविड पाॅझिटीव्ह

फलटण तालुक्यात २० लोकांचे रिपोर्ट आले कोविड पाॅझिटीव्ह

फलटण / अनमोल जगताप

फलटण शहरासह फलटण तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की राजाळे येथील ४२ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.सदर व्यक्तीचा स्वॅब हा सातारा सिव्हील हाॅस्पीटल येथे घेण्यात आला होता,असे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले आहे.निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु होते .लक्ष्मीनगर फलटण  येथील पूर्वी पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ८७, ५०, १६ व १० वर्षीय पुरुष/मुले तसेच ७७,४५ व ३८ वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. एकूण ७ लोकांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.तर फलटण शहराच्या लगतच असलेले मलठण येथील ३३ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.

फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील मुंजवडी येथील पूर्वी पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३३, ३५, ९ व १० वर्षीय पुरुष/मुले तसेच ६६ व ३० वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. एकूण ६ लोकांचे अहवाल कोविड पाॅझिटीव्ह आले आहेत.

जिंती नाका, फलटण  येथील पूर्वी पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३५ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय मुलगा तसेच  ३८ वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. एकूण ३ लोकांचे अहवाल कोविड पाॅझिटीव्ह आले आहेत.तसेच जिंती नाका, फलटण  येथील पूर्वी पाॅझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील मंगळवार पेठ येथील ३० वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.

फलटण तालुक्यातील कुरवली खु. येथील ५९ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे.सदर व्यक्तींचा दि २७/०७/२०२० रोजी मृत्यू झाला आहे.एकूण २० जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.