मालखेड येथे पुरग्रस्तांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधोपचार.

मालखेड येथे पुरग्रस्तांसाठी आरोग्य तपासणी  शिबीर  व मोफत औषधोपचार.

 

 

कराड/प्रतिनिधी :

                        मालखेड ता.कराड येथे बलवडी ता. खानापूर येथील स्व. नेताजी कृष्णा गायकवाड यांच्या स्मरणार्थ पुरग्रस्तांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कराड येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. धिरज नेताजी गायकवाड यांच्यावतीने मालखेड जिल्हा परिषद शाळेत हे शिबीर संपन्न झाले. शिबीराचा सव्वाशे लोकांनी लाभ घेतला. यावेळी मालखेडच्या सरपंच माधुरी पवार, उपसरपंच शंकर गडगे, ग्रामसेविका ए. एस. पुजारी, पोलीस पाटील स्वाती शिवदास, पकंज बुरंगे, देवदास माने, विक्रम शिवदास, शिवाजीराव थोरात, संजय थोरात, रविंद्र थोरात, सुनिल थोरात, विश्वास पवार, बाजीराव माने, विजय होवाळ, रामचंद्र होवाळ इत्यादींनी भेट दिल तालुक्यातील पुर परिस्थिती ओसरल्यानंतर गावात रोगराई पसरू नये, याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये येथील पूरग्रस्त लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच या गावाला नदीचे पाणी वापरण्यात येत असल्याने सध्या नदीच्या दूषित पाण्यातून होणाऱ्या संभाव्य साथीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. 

                   या शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांची मोफत तपासणी केल्याबद्दल मालखेड ग्रामपंचायतीच्यावतीने डॉ. धिरज गायकवाड व त्यांचे सहकारी सौरभ चतुर्वेदी व अरविंद धावारे यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला.