बेलवडेत जिल्हा बँकेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा 

बेलवडेत जिल्हा बँकेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा 

 

कराड/प्रतिनिधी : 
                        बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 70 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाखाप्रमुख सुहास जगधनी यांनी बँकेच्या सात दशकांच्या वाटचालीचा तसेच बँकेमार्फत कृषी व ग्रामीण सहकारी विकासातील योगदानाची माहिती दिली. 
                       यावेळी कार्यक्रमास जयवंतराव मोहिते, भरत कुंभार, अर्जुन मोहिते, माजी सरपंच दौलतराव मोहिते, दत्तप्रसाद शिंदे, पी.ए. पाटील यांच्यासह खातेदार उपस्थित होते. 
                     दरम्यान, बँकेच्या ग्राहकांना ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. तसेच वर्धापन दिनानिमित्त बचत गटाच्या मेळाव्याचेही आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांचे खाते उघडून त्यांना स्टुडन्ट कार्डविषयी माहिती देण्यात आली. जे.एम. शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.