सामूहिक गोळीबारातून तर बचावले, परंतु अनेक वर्षांनंतरही रक्तात गोळ्यांचे विष तसेच; जखमींना भाेगावे लागताहेत गंभीर परिणाम

अमेरिकेत बंदूक हिंसाचारात माेठ्या संख्येत नागरिकांचे प्राण जाण्यासह इतर काही धाेकेही समाेर येत आहेत. देशातील हजारो जण शरीरात राहून गेलेल्या गोळ्यांच्या धातू-शिशाच्या (लीड) विषाचा सामना करत आहेत. यूएस डिसीज कंट्रोल, प्रिव्हेन्शन सेंटर्सच्या (सीडीसी) माहितीनुसार दरवर्षी गोळ्या लागून ८० हजार जण जखमी हाेतात. तसेच एवढ्याच लाेकांना शरीरात शिसे राहून गेल्याने गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे.सीडीसीने २०१७ मध्ये गाेळ्यांतील शिशामुळे निर्माण हाेणाऱ्या दुष्परिणामांवर पहिल्यांदा जारी केलेल्या अहवालात म्हटले हाेते की, २००३-२०१२ दरम्यान गाेळीबारात जखमी ४५७ जणांच्या रक्तात शिशाची पातळी जास्त आढळून आली. कारण जखमींच्या शरीरात गाेळ्यांचे अवशेष राहून गेले हाेते. सीडीसीमध्ये महामारी विभागाच्या तज्ज्ञ डेबाेरा वीस सांगतात की, अशा प्रकरणांची खरी संख्या यापेक्षा जास्त असू शकते. कॅलिफाेर्निया विद्यापीठातील टाॅक्सिकाॅलाॅजीचे प्रा.डाेनाल्ड स्मिथ यांनी सांगितले की, शिशाच्या दुष्परिणामांवर खूप संशाेधन झाले आहे. स्मिथ यांच्या पथकाने केलेल्या याबाबतच्या संशाेधनामुळे कॅलिफाेर्नियात शिकाऱ्यांना शिसे असलेल्या गाेळ्या आदींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जगातील सर्वात माेठ्या पक्ष्यांपैकी एक काेंडाेर्सवर शिशाच्या गंभीर परिणामांवरील अभ्यासात शिशामुळे हे पक्षी माेठ्या संख्येने मरण पावत आहेत किंवा आजारी पडत असल्याचे दिसून आले. या पक्ष्यांनी अशा जनावरांचे मांस खाल्ले हाेते, ज्यांना शिशाच्या गाेळ्यांनी ठार मारण्यात आले हाेते. तसेच त्यांनाही अशा गाेळ्या लागल्या हाेत्या. अनेकदा शरीरात शिशाच्या गाेळ्या किंवा त्यांच्या अवशेषाच्या आजूबाजूला सुरक्षित कवच बनून जाते व यामुळे शरीराचे काेणतेही नुकसान हाेत नाही. काही प्रकरणांत मात्र कालांतराने ते अवशेष रक्तात मिसळतात. ट्राॅमा चिकित्सक काेन यांच्या मते यापैकी ७५ % लाेकांच्या शरीरात गाेळ्यांचे अवशेष, छर्रे आदी राहून जातात.शरीरात सुरक्षित पातळीपेक्षा जास्त शिशामुळे थकवा जाणवणे, डाेकेदुखी, पाेटदुखी आदी समस्या निर्माण हाेतात व नंतर त्या गंभीर आजाराचे रूप धारण करतात. त्यासाठी अमेरिकी सरकारने १९९१ मध्ये शिसे आधारित शस्त्रांच्या नियंत्रणासाठी नियम बनवले व ओबामा सरकारने २०१७ मध्ये शिशाच्या गाेळ्यांनी जनावरांच्या शिकारीवर बंदी आणली हाेती; परंतु नंतर ट्रम्प सरकारने हा नियम रद्द केला. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था याबाबतचे कायदे बदलण्याची मागणी करत आहेत. शिशामुळे मानवास हाेणाऱ्या नुकसानीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत मानवाच्या सुरक्षेसाठी काेणतीही पावले उचलली जात नसल्याचे टेक्सास विद्यापीठाच्या प्रमुख इकेना ओकेरेके यांनी सांगितले.आयुष्यभर आजाराचा सामनाशिशाच्या विषाचा सामना करणारे कोलिन गोडार्ड हे १६ एप्रिल २००७ राेजी व्हर्जिनिया टेकमध्ये झालेल्या सामूहिक नरसंहारात गंभीर जखमी झाले हाेते. गोडार्ड यांना तीन गोळ्या लागल्या हाेत्या. तथापि, गोळ्यांच्या अवशेषांमुळे जीवाला धाेका नसल्याने डाॅक्टरांनी ते त्यांच्या शरीरातच राहू दिले हाेते. मात्र, फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना थकवा जाणवू लागला. जास्त कामामुळे हे हाेत असावे, असे त्यांना वाटायचे; परंतु रक्त तपासणीनंतर गाेडार्ड यांच्या शरीरात सुरक्षित स्तरापेक्षा सातपट जास्त शिशे आढळून आले. त्यामुळे त्यांना न्यूरोलॉजिकल व किडनीच्या आजाराचा धाेका निर्माण झाला असून, शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी रोज ३१ गोळ्या खाव्या लागतात. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today कोलिन गोडार्ड तिच्या कुटुंबासाेबत


 सामूहिक गोळीबारातून तर बचावले, परंतु अनेक वर्षांनंतरही रक्तात गोळ्यांचे विष तसेच; जखमींना भाेगावे लागताहेत गंभीर परिणाम

अमेरिकेत बंदूक हिंसाचारात माेठ्या संख्येत नागरिकांचे प्राण जाण्यासह इतर काही धाेकेही समाेर येत आहेत. देशातील हजारो जण शरीरात राहून गेलेल्या गोळ्यांच्या धातू-शिशाच्या (लीड) विषाचा सामना करत आहेत. यूएस डिसीज कंट्रोल, प्रिव्हेन्शन सेंटर्सच्या (सीडीसी) माहितीनुसार दरवर्षी गोळ्या लागून ८० हजार जण जखमी हाेतात. तसेच एवढ्याच लाेकांना शरीरात शिसे राहून गेल्याने गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे.

सीडीसीने २०१७ मध्ये गाेळ्यांतील शिशामुळे निर्माण हाेणाऱ्या दुष्परिणामांवर पहिल्यांदा जारी केलेल्या अहवालात म्हटले हाेते की, २००३-२०१२ दरम्यान गाेळीबारात जखमी ४५७ जणांच्या रक्तात शिशाची पातळी जास्त आढळून आली. कारण जखमींच्या शरीरात गाेळ्यांचे अवशेष राहून गेले हाेते. सीडीसीमध्ये महामारी विभागाच्या तज्ज्ञ डेबाेरा वीस सांगतात की, अशा प्रकरणांची खरी संख्या यापेक्षा जास्त असू शकते. कॅलिफाेर्निया विद्यापीठातील टाॅक्सिकाॅलाॅजीचे प्रा.डाेनाल्ड स्मिथ यांनी सांगितले की, शिशाच्या दुष्परिणामांवर खूप संशाेधन झाले आहे. स्मिथ यांच्या पथकाने केलेल्या याबाबतच्या संशाेधनामुळे कॅलिफाेर्नियात शिकाऱ्यांना शिसे असलेल्या गाेळ्या आदींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जगातील सर्वात माेठ्या पक्ष्यांपैकी एक काेंडाेर्सवर शिशाच्या गंभीर परिणामांवरील अभ्यासात शिशामुळे हे पक्षी माेठ्या संख्येने मरण पावत आहेत किंवा आजारी पडत असल्याचे दिसून आले. या पक्ष्यांनी अशा जनावरांचे मांस खाल्ले हाेते, ज्यांना शिशाच्या गाेळ्यांनी ठार मारण्यात आले हाेते. तसेच त्यांनाही अशा गाेळ्या लागल्या हाेत्या. अनेकदा शरीरात शिशाच्या गाेळ्या किंवा त्यांच्या अवशेषाच्या आजूबाजूला सुरक्षित कवच बनून जाते व यामुळे शरीराचे काेणतेही नुकसान हाेत नाही. काही प्रकरणांत मात्र कालांतराने ते अवशेष रक्तात मिसळतात. ट्राॅमा चिकित्सक काेन यांच्या मते यापैकी ७५ % लाेकांच्या शरीरात गाेळ्यांचे अवशेष, छर्रे आदी राहून जातात.

शरीरात सुरक्षित पातळीपेक्षा जास्त शिशामुळे थकवा जाणवणे, डाेकेदुखी, पाेटदुखी आदी समस्या निर्माण हाेतात व नंतर त्या गंभीर आजाराचे रूप धारण करतात. त्यासाठी अमेरिकी सरकारने १९९१ मध्ये शिसे आधारित शस्त्रांच्या नियंत्रणासाठी नियम बनवले व ओबामा सरकारने २०१७ मध्ये शिशाच्या गाेळ्यांनी जनावरांच्या शिकारीवर बंदी आणली हाेती; परंतु नंतर ट्रम्प सरकारने हा नियम रद्द केला. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था याबाबतचे कायदे बदलण्याची मागणी करत आहेत. शिशामुळे मानवास हाेणाऱ्या नुकसानीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत मानवाच्या सुरक्षेसाठी काेणतीही पावले उचलली जात नसल्याचे टेक्सास विद्यापीठाच्या प्रमुख इकेना ओकेरेके यांनी सांगितले.

आयुष्यभर आजाराचा सामना
शिशाच्या विषाचा सामना करणारे कोलिन गोडार्ड हे १६ एप्रिल २००७ राेजी व्हर्जिनिया टेकमध्ये झालेल्या सामूहिक नरसंहारात गंभीर जखमी झाले हाेते. गोडार्ड यांना तीन गोळ्या लागल्या हाेत्या. तथापि, गोळ्यांच्या अवशेषांमुळे जीवाला धाेका नसल्याने डाॅक्टरांनी ते त्यांच्या शरीरातच राहू दिले हाेते. मात्र, फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना थकवा जाणवू लागला. जास्त कामामुळे हे हाेत असावे, असे त्यांना वाटायचे; परंतु रक्त तपासणीनंतर गाेडार्ड यांच्या शरीरात सुरक्षित स्तरापेक्षा सातपट जास्त शिशे आढळून आले. त्यामुळे त्यांना न्यूरोलॉजिकल व किडनीच्या आजाराचा धाेका निर्माण झाला असून, शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी रोज ३१ गोळ्या खाव्या लागतात.Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
कोलिन गोडार्ड तिच्या कुटुंबासाेबत