तालिबानची प्रतिक्रिया : शांतता चर्चा प्रक्रियेतील अमेरिकेसोबतची सातवी फेरी निर्णायक ठरण्याची अपेक्षा

इस्लामाबाद -अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता चर्चेतील सातवी फेरी ‘निर्णायक’ असेल, अशी प्रतिक्रिया तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी रविवारी व्यक्त केली. अमेरिकेचे शांतता प्रक्रियेतील दूत झाल्मे खालिजाद यांच्याशी तालिबानची कतारमध्ये शांतता चर्चा सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कतार येथे तालिबानचे राजकीय कार्यालय आहे.वृत्तसंस्थेशी बोलताना शाहीन म्हणाले की, अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो संघटनेचे २० हजार सैनिक माघारी बोलावण्यासाठी आणि प्रदीर्घ काळ सुरू असलेली लढाई थांबवण्यासाठी एक करार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून काही ‘निश्चित निकाल’ मिळेल यावर दोन्ही बाजूंचा भर आहे. जगभरात हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही अशी हमी या करारात देण्यात येईल, अशीही अपेक्षा आहे.अफगाणिस्तानमध्ये प्रदीर्घ काळ चाललेली लढाई संपवण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत एक करार होईल, अशी अपेक्षा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाॅम्पिओ यांनी अलीकडेच व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंत शनिवारी चर्चा सुरू झाली. ही चर्चा पुढील आठवड्यातही सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.तालिबानशी १ सप्टेंबरपर्यंत सर्वंकष शांतता करार झाल्यास ती घटना चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील विल्सन सेंटरचे उपसंचालक मायकेल कुगलमन यांनी व्यक्त केली होती. या मुद्द्यावर पुरेशी प्रगती झाली आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपर्यंत हा करार होऊ शकतो, असेही कुगलमन यांनी नमूद केले. परराष्ट्रमंत्री पाॅम्पिओ आणि शांतता चर्चेतील अमेरिकेचे दूत झाल्मे खालिजाद या दोघांनीही म्हटले होते की, अंतिम करारात लष्कर माघारी घेण्याच्या मुद्द्याचा समावेश तर असेलच, शिवाय अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत चर्चा सुरू ठेवण्याच्या आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधी करण्याच्या मुद्द्याचाही समावेश असेल.तालिबान आतापर्यंत अफगाणिस्तान सरकारशी थेट चर्चा करण्यास नकार देत आला आहे. मात्र तालिबानने माजी अध्यक्ष हामिद करझाई आणि नाॅर्दन अलायन्सच्या सदस्यांशी तसेच सरकारमधील काही सदस्यांशी चर्चा केली आहे. आम्ही सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊ, पण ती फक्त सामान्य अफगाणी नागरिक म्हणून घेऊ, असे तालिबानने स्पष्ट केले होते.तालिबानने अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या सरकारला ‘अमेरिकेचे बाहुले’ असेही संबोधले होते. अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटोचे सर्व सैनिक जोपर्यंत माघार घेत नाहीत तोपर्यंत शस्त्रसंधीसही तालिबानने नकार दिला होता. अमेरिकेने आपल्या वचनापासून माघार घेतली तर परिस्थिती कठीण होईल, असेही तालिबानने स्पष्ट केले होते. त्यामुळे शांतता प्रक्रियेत अडचण निर्माण झाली होती.२८ सप्टेंबरला अध्यक्षीय निवडणूक घेण्याची घनी यांची इच्छाअफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी २८ सप्टेंबरला अध्यक्षीय निवडणूक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे शांतता चर्चेला आलेली गती आणि करारासाठी १ सप्टेंबरपर्यंतची मुदत या दोन मुद्द्यांचा घनी यांच्या घोषणशी संबंध अाहे, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. राजकीय विरोधकांनी मात्र घनी यांच्यावर निवडणूक घेण्याच्या संकेतावरून टीका केली आहे. त्यांनी त्यासाठी गेल्या आॅक्टोबरमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीचा दाखला दिला आहे. मतदान व्यवस्था एवढी विस्कळीत होती की घनी यांनी संपूर्ण निवडणूक आयोगच बरखास्त केला होता, अद्यापही काही संसदीय मतदारसंघात मतदान व्हायचे आहे याकडे विरोधकांनी लक्ष वेधले होते. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टिम आणण्यात आली होती, पण त्याचे योग्य प्रशिक्षणही देण्यात आले नव्हते, अशी टीका विरोधकांनी केली होती. निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्याही अनेक घटना घडल्या होत्या. गैरव्यवस्थापन आणि घोटाळे हे या निवडणुकीतील दोष होते. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today The Taliban's reaction: Expecting to be the seventh round of peace with America in the process of peace talks


 तालिबानची प्रतिक्रिया : शांतता चर्चा प्रक्रियेतील अमेरिकेसोबतची सातवी फेरी निर्णायक ठरण्याची अपेक्षा

इस्लामाबाद -अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता चर्चेतील सातवी फेरी ‘निर्णायक’ असेल, अशी प्रतिक्रिया तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी रविवारी व्यक्त केली. अमेरिकेचे शांतता प्रक्रियेतील दूत झाल्मे खालिजाद यांच्याशी तालिबानची कतारमध्ये शांतता चर्चा सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीन यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कतार येथे तालिबानचे राजकीय कार्यालय आहे.


वृत्तसंस्थेशी बोलताना शाहीन म्हणाले की, अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो संघटनेचे २० हजार सैनिक माघारी बोलावण्यासाठी आणि प्रदीर्घ काळ सुरू असलेली लढाई थांबवण्यासाठी एक करार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून काही ‘निश्चित निकाल’ मिळेल यावर दोन्ही बाजूंचा भर आहे. जगभरात हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही अशी हमी या करारात देण्यात येईल, अशीही अपेक्षा आहे.
अफगाणिस्तानमध्ये प्रदीर्घ काळ चाललेली लढाई संपवण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत एक करार होईल, अशी अपेक्षा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाॅम्पिओ यांनी अलीकडेच व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंत शनिवारी चर्चा सुरू झाली. ही चर्चा पुढील आठवड्यातही सुरू राहील, अशी अपेक्षा आहे.


तालिबानशी १ सप्टेंबरपर्यंत सर्वंकष शांतता करार झाल्यास ती घटना चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील विल्सन सेंटरचे उपसंचालक मायकेल कुगलमन यांनी व्यक्त केली होती. या मुद्द्यावर पुरेशी प्रगती झाली आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपर्यंत हा करार होऊ शकतो, असेही कुगलमन यांनी नमूद केले. परराष्ट्रमंत्री पाॅम्पिओ आणि शांतता चर्चेतील अमेरिकेचे दूत झाल्मे खालिजाद या दोघांनीही म्हटले होते की, अंतिम करारात लष्कर माघारी घेण्याच्या मुद्द्याचा समावेश तर असेलच, शिवाय अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत चर्चा सुरू ठेवण्याच्या आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधी करण्याच्या मुद्द्याचाही समावेश असेल.


तालिबान आतापर्यंत अफगाणिस्तान सरकारशी थेट चर्चा करण्यास नकार देत आला आहे. मात्र तालिबानने माजी अध्यक्ष हामिद करझाई आणि नाॅर्दन अलायन्सच्या सदस्यांशी तसेच सरकारमधील काही सदस्यांशी चर्चा केली आहे. आम्ही सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊ, पण ती फक्त सामान्य अफगाणी नागरिक म्हणून घेऊ, असे तालिबानने स्पष्ट केले होते.


तालिबानने अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या सरकारला ‘अमेरिकेचे बाहुले’ असेही संबोधले होते. अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटोचे सर्व सैनिक जोपर्यंत माघार घेत नाहीत तोपर्यंत शस्त्रसंधीसही तालिबानने नकार दिला होता. अमेरिकेने आपल्या वचनापासून माघार घेतली तर परिस्थिती कठीण होईल, असेही तालिबानने स्पष्ट केले होते. त्यामुळे शांतता प्रक्रियेत अडचण निर्माण झाली होती.

२८ सप्टेंबरला अध्यक्षीय निवडणूक घेण्याची घनी यांची इच्छा
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी २८ सप्टेंबरला अध्यक्षीय निवडणूक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे शांतता चर्चेला आलेली गती आणि करारासाठी १ सप्टेंबरपर्यंतची मुदत या दोन मुद्द्यांचा घनी यांच्या घोषणशी संबंध अाहे, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. राजकीय विरोधकांनी मात्र घनी यांच्यावर निवडणूक घेण्याच्या संकेतावरून टीका केली आहे. त्यांनी त्यासाठी गेल्या आॅक्टोबरमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीचा दाखला दिला आहे. मतदान व्यवस्था एवढी विस्कळीत होती की घनी यांनी संपूर्ण निवडणूक आयोगच बरखास्त केला होता, अद्यापही काही संसदीय मतदारसंघात मतदान व्हायचे आहे याकडे विरोधकांनी लक्ष वेधले होते. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टिम आणण्यात आली होती, पण त्याचे योग्य प्रशिक्षणही देण्यात आले नव्हते, अशी टीका विरोधकांनी केली होती. निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्याही अनेक घटना घडल्या होत्या. गैरव्यवस्थापन आणि घोटाळे हे या निवडणुकीतील दोष होते.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
The Taliban's reaction: Expecting to be the seventh round of peace with America in the process of peace talks