घरी जाऊन अथवा बोलावून केस कापल्यास होणार गुन्हा :-एस. पी. तेजस्वी सातपुते

संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.

घरी जाऊन अथवा बोलावून केस कापल्यास होणार गुन्हा :-एस. पी. तेजस्वी सातपुते

केशकर्तनालय व्यवसाय सुरु केल्यास गुन्हा दाखल करणार: पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते
सातारा दि. 27( जि. मा. का ): संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच  केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
कोरोना विर्षाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व स्तरांवर मोठया प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत.  यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने या काळात कालावधीत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु वितरण वगळता सर्व आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार केशकर्तनालय सुरू करणेस बंदी असून त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केलेस संबंधीतावर भारतीय दंड सहिंता चे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्हा दाखल करणेत येईल.  कोणत्याही व्यक्तीने बंदी आदेशाचा भंग करून केशकर्तनालय दुकान सुरू करू नये. तसेच संचारबंदी (लॉकडाऊन) कालावधीत शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तिच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच  केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका पत्रकान्वये अधिकराव लक्ष्मणराव चव्हाण, सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांना कळविले आहे.