साहेब कोरोना विषाणूकडे घड्याळ नाही..!

वेळ बघून कोरोना होत नाही करायचं आहे तर कडक लॉक डाउन करा

साहेब कोरोना विषाणूकडे घड्याळ नाही..!

कराड/प्रतिनिधी

वेळ बदलली तरी कोरोना होणार नाही याची खात्री जिल्हा प्रशासन देणार आहे का? 9 ते 5 या वेळेत बाहेर येणारी लोकं आता 9 ते 2 या वेळेत बाहेर येत आहेत. पहिल्यापेक्षा गर्दी वाढणार तसेच 5 तासात अनावश्यक खरेदी साठी नागरिकांची झुंबड उडणार आहे. यामुळे साहेब करायचंय तर कडक लॉक डाउन करा अशी चर्चा लोकांच्यात सुरू झाली आहे.

बँका,पतसंस्था, पोस्ट ऑफिस,मेडिकल,यांच्या बाबत काय धोरण आहे याचा उलगडा होत नाही तसेच पुणे जिल्हयात पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाकेबाज निर्णय घेत 15 दिवसांचा लॉक डाउन 13 जुलै पासून जाहीर केला आहे,संदिग्ध निर्णय घेण्यापेक्षा ठोस निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जिल्ह्यातील वाढती कोरोना बधितांची संख्या आणि रोज बदलते शासन निर्णय यामुळे जनता मेटाकुटीला आली असून सवलत मिळाली की जनता रस्त्यावर यायला मागेपुढे बघत नसून यावर कडक लॉकडाउनचा उतारा एकमेव पर्याय ठरू शकतो.