बेलवडे बुद्रुक येथे रविवारी आरोग्य तपासणी शिबिर

बेलवडे बुद्रुक येथे रविवारी आरोग्य तपासणी शिबिर
 
 

बेलवडे बुद्रुक येथे रविवारी आरोग्य तपासणी शिबिर 

 

कराड/प्रतिनिधी :

     बेलवडे बुद्रुक ता. कराड येथे नारायण राजाराम मोहिते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवारी 9 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवचैतन्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

     या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मधुमेह, हृदयरोगगुडगेदुखी, सांधेदुखीकर्करोग व संबंधित गाठींची तपासणी व उपचारहिमोग्लोबीन व रक्तगट तपासणीरक्तातील साखर तपासणीईसीजी तपासणी मोफत केली जाणार आहे. डॉ. सुशांत मोहिते, डॉ. विजयसिंह पाटीलडॉ. ओंकार काकरे, डॉ. प्रतीक मोटे आदींच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. या मोफत शिबिराचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.