इचलकरंजीत सात ते आठ हातभट्ट्यांवर कारवाई

इचलकरंजी - येथील शांतीनगर परिसरातील सात ते आठ दारूच्या हातभट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क व गावभाग पोलीस यांच्या संयुक्त पथकांने ही कारवाई केली. या कारवाईत बनावट देशी - विदेशी दारूसाठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. सुमारे दोन तास ही धडक कारवाई सुरू होती. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून कारवाईवेळी वादावादीचे प्रसंग घडल्याने तणाव निर्माण झाला होता. येथील शांतीनगर परिसरात गावठी दारुची राजरोस विक्री होेते. त्याच बरोबर बनावट दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज राज्य उत्पादन शुल्क व गावभाग पोलीस यांच्या संयुक्त पथकाने सकाळी आठच्या सुमारास कारवाईस सुरुवात केली. तीस ते पस्तीस घराची तपासणी केली. त्यामध्ये सात ते आठ गावठी दारु तयार करणार्‍या हातभट्टया आढळून आल्या. येथे सापडलेले कच्चे रसायन व अन्य अन्य साहित्य फोडून टाकण्यात आले. काहीना ताब्यात घेण्यासाठी धरपकड सुरू होती. यावेळी काही महिलांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. या कारवाईत बनावट दारूचे नऊ बाॅक्स देखील पोलीस पथकाच्या हाती लागली आहेत. यात देशी-विदेशी दारुचा समावेश आहे. या कारवाईत सुमारे दीडशे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. सोबत वाहनांचा मोठा ताफा होता. कारवाईवेळी संशयितांनी पळापळ केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक गजेंद्र लोहार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक पी.आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांनंतर मोठी कारवाई गेल्या अनेक दिवसानंतर प्रथमच या परिसरात आज मोठी कारवाई करण्यात आली. याच परिसरातून पोलिसांनी दोन ते तीन वेळा गांजा साठा जप्त केला होता.  News Item ID: 599-news_story-1562662802Mobile Device Headline: इचलकरंजीत सात ते आठ हातभट्ट्यांवर कारवाईAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: इचलकरंजी - येथील शांतीनगर परिसरातील सात ते आठ दारूच्या हातभट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क व गावभाग पोलीस यांच्या संयुक्त पथकांने ही कारवाई केली. या कारवाईत बनावट देशी - विदेशी दारूसाठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. सुमारे दोन तास ही धडक कारवाई सुरू होती. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून कारवाईवेळी वादावादीचे प्रसंग घडल्याने तणाव निर्माण झाला होता. येथील शांतीनगर परिसरात गावठी दारुची राजरोस विक्री होेते. त्याच बरोबर बनावट दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज राज्य उत्पादन शुल्क व गावभाग पोलीस यांच्या संयुक्त पथकाने सकाळी आठच्या सुमारास कारवाईस सुरुवात केली. तीस ते पस्तीस घराची तपासणी केली. त्यामध्ये सात ते आठ गावठी दारु तयार करणार्‍या हातभट्टया आढळून आल्या. येथे सापडलेले कच्चे रसायन व अन्य अन्य साहित्य फोडून टाकण्यात आले. काहीना ताब्यात घेण्यासाठी धरपकड सुरू होती. यावेळी काही महिलांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. या कारवाईत बनावट दारूचे नऊ बाॅक्स देखील पोलीस पथकाच्या हाती लागली आहेत. यात देशी-विदेशी दारुचा समावेश आहे. या कारवाईत सुमारे दीडशे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. सोबत वाहनांचा मोठा ताफा होता. कारवाईवेळी संशयितांनी पळापळ केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक गजेंद्र लोहार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक पी.आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांनंतर मोठी कारवाई गेल्या अनेक दिवसानंतर प्रथमच या परिसरात आज मोठी कारवाई करण्यात आली. याच परिसरातून पोलिसांनी दोन ते तीन वेळा गांजा साठा जप्त केला होता.  Vertical Image: English Headline: Action on seven to eight liquor factory in IchalkaranjiAuthor Type: External Authorपंडित कोंडेकरपोलीससाहित्यliteratureमहिलाwomenSearch Functional Tags: पोलीस, साहित्य, Literature, महिला, womenTwitter Publish: 

इचलकरंजीत सात ते आठ हातभट्ट्यांवर कारवाई

इचलकरंजी - येथील शांतीनगर परिसरातील सात ते आठ दारूच्या हातभट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क व गावभाग पोलीस यांच्या संयुक्त पथकांने ही कारवाई केली. या कारवाईत बनावट देशी - विदेशी दारूसाठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. सुमारे दोन तास ही धडक कारवाई सुरू होती.

याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून कारवाईवेळी वादावादीचे प्रसंग घडल्याने तणाव निर्माण झाला होता. येथील शांतीनगर परिसरात गावठी दारुची राजरोस विक्री होेते. त्याच बरोबर बनावट दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज राज्य उत्पादन शुल्क व गावभाग पोलीस यांच्या संयुक्त पथकाने सकाळी आठच्या सुमारास कारवाईस सुरुवात केली.

तीस ते पस्तीस घराची तपासणी केली. त्यामध्ये सात ते आठ गावठी दारु तयार करणार्‍या हातभट्टया आढळून आल्या. येथे सापडलेले कच्चे रसायन व अन्य अन्य साहित्य फोडून टाकण्यात आले. काहीना ताब्यात घेण्यासाठी धरपकड सुरू होती. यावेळी काही महिलांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. या कारवाईत बनावट दारूचे नऊ बाॅक्स देखील पोलीस पथकाच्या हाती लागली आहेत. यात देशी-विदेशी दारुचा समावेश आहे. या कारवाईत सुमारे दीडशे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. सोबत वाहनांचा मोठा ताफा होता. कारवाईवेळी संशयितांनी पळापळ केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक गजेंद्र लोहार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक पी.आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

अनेक दिवसांनंतर मोठी कारवाई
गेल्या अनेक दिवसानंतर प्रथमच या परिसरात आज मोठी कारवाई करण्यात आली. याच परिसरातून पोलिसांनी दोन ते तीन वेळा गांजा साठा जप्त केला होता. 

News Item ID: 
599-news_story-1562662802
Mobile Device Headline: 
इचलकरंजीत सात ते आठ हातभट्ट्यांवर कारवाई
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Action on seven to eight liquor factory in Ichalkaranji
Author Type: 
External Author
पंडित कोंडेकर
Search Functional Tags: 
पोलीस, साहित्य, Literature, महिला, women
Twitter Publish: