नराधम समाधान कळसकरावर गुन्हा दाखल होऊन फलटण ग्रामीण पोलीसांच्या मदतीने फरार?

नराधम समाधान कळसकरावर गुन्हा दाखल होऊन फलटण ग्रामीण पोलीसांच्या मदतीने फरार?

नराधम समाधान कळसकरावर गुन्हा दाखल होऊन फलटण ग्रामीण पोलीसांच्या मदतीने फरार?

फलटण/अनमोल जगताप -

 

निंबळक (ता.फलटण) येथील जिल्हा परिषदेच्या विलगीकरण कक्षात निंबळकच्या पोलीस पाटलांनी विनयभंग केला असल्याची तक्रार पिडीत मागासवर्गीय महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून संबंधित पोलीस पाटला विरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरिक्षक नितीन सावंत यांनी दिली होती.
 
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला ही निंबळक ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षात असताना तसेच ती महिला मागासवर्गीय आहे हे आरोपी पोलीस पाटील समाधान कळसकर यांना माहित असताना फिर्यादी महिलेच्या खोलीत येवून तू माझे सोबत रहा. तुला व तुझ्या मुलींना काही कमी पडून देणार नाही. तुझा चांगला सांभाळ करीन असे म्हणून वाईट हेतूने फिर्यादी महिलेचा उजवा हात धरुन फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न करुन तिचा विनयभंग केला. तसेच दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता व त्यानंतर सायंकाळी 4:00 वाजण्याच्या सुमारास विलगीकरण कक्षातील खोलीत येवून तू विचार कर, माझ्याकडे पुष्कळ पैसे आहेत. तुझा चांगला सांभाळ करीन असे म्हणून पिडीत महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न करून विनयभंग केला.

सदरबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस पाटील समाधान कळसकर याच्या विरोधात अनुसुचित जाती आणि असुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

गुरुवार दिनांक २२ जुलै रोजी नराधम पोलीस पाटील समाधान कळसकर याच्यावर अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून देखील अद्यापही त्याला  अटक करण्यात आली नाही.त्यामुळे दलित समाज्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
अनुसुचित जाती आणि जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला २४ तासांच्या आत अटक करण्याची तरतूद आहे.

मात्र या तरतूदीला फलटण ग्रामीण पोलीसांनी केराची टोपली दाखवली आहे.अशी चर्चा फलटण तालुक्यात चालू आहे.


सातारा पोलीस दलाची अब्रु वेशीवर?


सातारा पोलीस दलाने अनेक कुख्यात गुंडांना आपल्या खाकीचा हिसका दाखवला आहे.कित्येक गुंडांना अवघ्या काही तासांच्या आत बाहेरील जिल्ह्यातून अटक करण्यात सातारा पोलीस दलाला यश आले आहे.मात्र फलटण ग्रामीण पोलीसांनी अनेक वेळा सातारा पोलीस दलाची अब्रु वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा फलटण तालुक्यासह जिल्ह्यात चालू आहे.