श्रीमंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा २९७ वा जयंती महोत्सव सोहळा रविवार दिनांक ५ जून रोजी

श्रीमंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा २९७ वा जयंती महोत्सव सोहळा रविवार दिनांक ५ जून रोजी

फलटण / प्रतिनिधी-

 

श्रीमंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा २९७ वा जयंती महोत्सव सोहळा रविवार दिनांक ५ जून २०२२ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

जयंती महोत्सवाच्या निमित्ताने फलटण येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये महेश्वर येथील राजवाड्याची भव्यदिव्य प्रतिकृती उभारण्यात येणार असून होळकर चौकाची आकर्षक अशी सजावट करण्यात येणार असून सकाळी ठिक ९ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून संध्याकाळी ठीक ५ वाजता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते व आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य मिरवणूकीचा शुभारंभ होणार असून  मिरवणुकीत  पारंपारिक वाद्य म्हणजे धनगरी गजी नृत्य, ढोल ताशे, झांज पथक, शिंगाडे उंट, घोडे तसेच पुण्याचा प्रसिद्ध ओंकार डि.जे. इत्यादी वाद्यसह अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची व विचारांची मिरवणूक संपूर्ण फलटण शहर मधून काढण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ही शेवटी श्रीमंत संजीवराजे यांनी आपल्या पत्रकात केले आहे.