राज्यसभेत भाजपची 'पॉवर' वाढणार; सहा खासदार करणार प्रवेश?

नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही थांबवण्याची तयारी नसल्याचे बोलले जाते. पुढच्या महिनाभरात होऊ घातलेल्या उपनिवडणुकांतच भाजपला राज्यसभेत बहुमतात आणण्यासाठी पक्षनेतृत्वाने कंबर कसली आहे.  वरिष्ठ सभागृहात साध्या बहुमतापासून केवळ पाच सदस्य संख्येइतक्‍या दूर असलेल्या भाजपच्या संपर्कात विरोधी पक्षांचे तब्बल सहा खासदार असून, अन्य पाच जागा रिकाम्या आहेत. या पाचपैकी तीन जागा भाजप आघाडीला मिळणे निश्‍चित आहे व विरोधकांपैकी जेवढे भाजपवासी होतील तेवढे, असे मिळून लवकरात लवकर राज्यसभेत बहुमत आणून तीन तलाक, दहशतवादविरोधी कायदा, काश्‍मीरबाबतचा संभाव्य कायदा आदी कळीची विधेयके येथे धडाधड मंजूर करण्याचा पक्षनेतृत्वाचा स्पष्ट इरादा दिसत आहे. सपाचे नीरज शेखर नुकतेच भाजपमध्ये आले. त्यांच्या पाठोपाठ या पक्षाचे किमान चार खासदार भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. खुद्द सपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने संसद परिसरात अनौपचारीकरीत्या बोलताना याबद्दलची कबुली दिली. जे सहा खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते त्यांना पुन्हा सहा वर्षांच्या खासदारकीची हमी मिळएल व भाजपचेही बहमत झाल्याने विधेयकांच्या मंजुरीसाठी विरोधकांची मनधरणी करण्याचे टळेल.  उपनिवडणुकीत रामविलास पासवान, स्मृती इराणी व एस जयशंकर हे तीनही खासदार भापने निवडून आणले. तेलगू देसमचे चार खासदार नुकतेच सत्तारूढ बाजूला आले आहेत. यामुळे राज्यसभेत कॉंग्रेसपेक्षा आताच मोठा पक्ष असलेली भाजप आघाडी येथील बहुमताच्या जादुई आकड्यापासून (123) केवळ पाच खासदारांपुरती दूर आहे. राज्यसभेत आजच पाच जागा रिक्त आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन, शरद यादव यांची अपात्रता, नीरज शेखर यांचा राजीनामा तसेच तमिळनाडू व ओरिसातील प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. यातील पहिल्या तीन जागा भाजप निवडून आणू शकतो. उर्वरीत दोन्ही राज्यांत अण्णाद्रमुक व ओडिशाचे नवीन पटनाईक यांचा कल सरळसरळ भाजपकडेच आहे. साहजिकच भाजपला पाच जागांचा लाभ होऊ शकतो. शिवाय सत्तारूढ पक्षात सपाचे चार खासदार आले तर हे बहुमत आणखी मजबूत होईल.  News Item ID: 599-news_story-1563635449Mobile Device Headline: राज्यसभेत भाजपची 'पॉवर' वाढणार; सहा खासदार करणार प्रवेश?Appearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही थांबवण्याची तयारी नसल्याचे बोलले जाते. पुढच्या महिनाभरात होऊ घातलेल्या उपनिवडणुकांतच भाजपला राज्यसभेत बहुमतात आणण्यासाठी पक्षनेतृत्वाने कंबर कसली आहे.  वरिष्ठ सभागृहात साध्या बहुमतापासून केवळ पाच सदस्य संख्येइतक्‍या दूर असलेल्या भाजपच्या संपर्कात विरोधी पक्षांचे तब्बल सहा खासदार असून, अन्य पाच जागा रिकाम्या आहेत. या पाचपैकी तीन जागा भाजप आघाडीला मिळणे निश्‍चित आहे व विरोधकांपैकी जेवढे भाजपवासी होतील तेवढे, असे मिळून लवकरात लवकर राज्यसभेत बहुमत आणून तीन तलाक, दहशतवादविरोधी कायदा, काश्‍मीरबाबतचा संभाव्य कायदा आदी कळीची विधेयके येथे धडाधड मंजूर करण्याचा पक्षनेतृत्वाचा स्पष्ट इरादा दिसत आहे. सपाचे नीरज शेखर नुकतेच भाजपमध्ये आले. त्यांच्या पाठोपाठ या पक्षाचे किमान चार खासदार भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. खुद्द सपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने संसद परिसरात अनौपचारीकरीत्या बोलताना याबद्दलची कबुली दिली. जे सहा खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते त्यांना पुन्हा सहा वर्षांच्या खासदारकीची हमी मिळएल व भाजपचेही बहमत झाल्याने विधेयकांच्या मंजुरीसाठी विरोधकांची मनधरणी करण्याचे टळेल.  उपनिवडणुकीत रामविलास पासवान, स्मृती इराणी व एस जयशंकर हे तीनही खासदार भापने निवडून आणले. तेलगू देसमचे चार खासदार नुकतेच सत्तारूढ बाजूला आले आहेत. यामुळे राज्यसभेत कॉंग्रेसपेक्षा आताच मोठा पक्ष असलेली भाजप आघाडी येथील बहुमताच्या जादुई आकड्यापासून (123) केवळ पाच खासदारांपुरती दूर आहे. राज्यसभेत आजच पाच जागा रिक्त आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन, शरद यादव यांची अपात्रता, नीरज शेखर यांचा राजीनामा तसेच तमिळनाडू व ओरिसातील प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. यातील पहिल्या तीन जागा भाजप निवडून आणू शकतो. उर्वरीत दोन्ही राज्यांत अण्णाद्रमुक व ओडिशाचे नवीन पटनाईक यांचा कल सरळसरळ भाजपकडेच आहे. साहजिकच भाजपला पाच जागांचा लाभ होऊ शकतो. शिवाय सत्तारूढ पक्षात सपाचे चार खासदार आले तर हे बहुमत आणखी मजबूत होईल.  Vertical Image: English Headline: BJP MP Seats will increases in Rajya SabhaAuthor Type: External Authorसकाळ न्यूज नेटवर्क smriti iraniस्मृती इराणीभाजपमोदी सरकारदुष्काळबहुमतशरद यादवतमिळनाडूओडिशानवीन पटनाईकnaveen patnaikSearch Functional Tags: Smriti Irani, स्मृती इराणी, भाजप, मोदी सरकार, दुष्काळ, बहुमत, शरद यादव, तमिळनाडू, ओडिशा, नवीन पटनाईक, Naveen PatnaikTwitter Publish: Meta Description: गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. Send as Notification: 

राज्यसभेत भाजपची 'पॉवर' वाढणार; सहा खासदार करणार प्रवेश?

नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही थांबवण्याची तयारी नसल्याचे बोलले जाते. पुढच्या महिनाभरात होऊ घातलेल्या उपनिवडणुकांतच भाजपला राज्यसभेत बहुमतात आणण्यासाठी पक्षनेतृत्वाने कंबर कसली आहे. 

वरिष्ठ सभागृहात साध्या बहुमतापासून केवळ पाच सदस्य संख्येइतक्‍या दूर असलेल्या भाजपच्या संपर्कात विरोधी पक्षांचे तब्बल सहा खासदार असून, अन्य पाच जागा रिकाम्या आहेत. या पाचपैकी तीन जागा भाजप आघाडीला मिळणे निश्‍चित आहे व विरोधकांपैकी जेवढे भाजपवासी होतील तेवढे, असे मिळून लवकरात लवकर राज्यसभेत बहुमत आणून तीन तलाक, दहशतवादविरोधी कायदा, काश्‍मीरबाबतचा संभाव्य कायदा आदी कळीची विधेयके येथे धडाधड मंजूर करण्याचा पक्षनेतृत्वाचा स्पष्ट इरादा दिसत आहे.

सपाचे नीरज शेखर नुकतेच भाजपमध्ये आले. त्यांच्या पाठोपाठ या पक्षाचे किमान चार खासदार भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. खुद्द सपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने संसद परिसरात अनौपचारीकरीत्या बोलताना याबद्दलची कबुली दिली. जे सहा खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते त्यांना पुन्हा सहा वर्षांच्या खासदारकीची हमी मिळएल व भाजपचेही बहमत झाल्याने विधेयकांच्या मंजुरीसाठी विरोधकांची मनधरणी करण्याचे टळेल. 

उपनिवडणुकीत रामविलास पासवान, स्मृती इराणी व एस जयशंकर हे तीनही खासदार भापने निवडून आणले. तेलगू देसमचे चार खासदार नुकतेच सत्तारूढ बाजूला आले आहेत. यामुळे राज्यसभेत कॉंग्रेसपेक्षा आताच मोठा पक्ष असलेली भाजप आघाडी येथील बहुमताच्या जादुई आकड्यापासून (123) केवळ पाच खासदारांपुरती दूर आहे. राज्यसभेत आजच पाच जागा रिक्त आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन, शरद यादव यांची अपात्रता, नीरज शेखर यांचा राजीनामा तसेच तमिळनाडू व ओरिसातील प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. यातील पहिल्या तीन जागा भाजप निवडून आणू शकतो.

उर्वरीत दोन्ही राज्यांत अण्णाद्रमुक व ओडिशाचे नवीन पटनाईक यांचा कल सरळसरळ भाजपकडेच आहे. साहजिकच भाजपला पाच जागांचा लाभ होऊ शकतो. शिवाय सत्तारूढ पक्षात सपाचे चार खासदार आले तर हे बहुमत आणखी मजबूत होईल. 

News Item ID: 
599-news_story-1563635449
Mobile Device Headline: 
राज्यसभेत भाजपची 'पॉवर' वाढणार; सहा खासदार करणार प्रवेश?
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
BJP MP Seats will increases in Rajya Sabha
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क 
Search Functional Tags: 
Smriti Irani, स्मृती इराणी, भाजप, मोदी सरकार, दुष्काळ, बहुमत, शरद यादव, तमिळनाडू, ओडिशा, नवीन पटनाईक, Naveen Patnaik
Twitter Publish: 
Meta Description: 
गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत.
Send as Notification: