सातारा जिल्ह्यातील कोरोना बाबत सर्वात मोठी घटना

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाबत सर्वात मोठी घटना

उंब्रज/प्रतिनिधी

गेले काही दिवस सलग कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या रात्री दहाच्या सुमारास जाहीर होत होती,परंतु रविवार दि.31 मे अपवाद ठरला असून प्रीतिसंगम संगम ऑनलाईन व्हाट्सएप नंबरला वाचकांनी मेसेज पाठवून रिपोर्ट बाबत खातरजमा करून घेतली यामुळे आज जिल्हावासीयांनी किमान आजची रात्र तरी कोरोनाचा प्रसार थांबला या समाधानाने पार पडेल.हीच या आठ दिवसातील कोरोना बाबत सर्वात मोठी घटना असून आज कोरोना बाधित एकही रुग्ण मिळून आला नाही.याबाबत जिल्ह्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

उंब्रज वैद्यकीय अधिकारी यांच्याशी  रिपोर्ट बाबत संपर्क साधला असता स्थानिक सातारा जिल्ह्यातील नागरिक कोरोना बाधित होण्याचे प्रमाण अत्यल्प असून बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले नागरिक यांच्यामुळे सलग आठ ते दहा दिवस कोरोना बाधित मोठ्या संख्येने मिळून येत होते परंतु आता यावर नियंत्रण आले असून लवकरच पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊन जनजीवन सामान्य होईल.अशी माहिती दिली