महाविकास आघाडी ‘पॉवरफूल’ तर भाजप ‘गारद’

राष्ट्रवादीचे पाटील भाजपच्या पाटलांना पडले भारी

महाविकास आघाडी ‘पॉवरफूल’ तर भाजप ‘गारद’


महाविकास आघाडी ‘पॉवरफूल’ तर भाजप ‘गारद’


राष्ट्रवादीचे पाटील भाजपच्या पाटलांना पडले भारी

 


पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडी ’पॉवरफूल’ ठरली असून त्याची राजकीय खेळी यशस्वी झाली आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या झंझावातात भाजपाला गारद करण्यात करण्यात यशस्वी झाली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला बसलेला हा मोठा सेटबॅॅक आहे. रंगलेल्या या राजकीय आखाड्यात अखेर राष्ट्रवादीचे प्रदेेशाध्यक्ष ना, जयंत पाटील  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भारी ठरले तर नवख्या प्रा, जयंत आसगावकर याना काँग्रेसने विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत याचा पराभव करत ही जागा खेचून आणली आणी भाजपला चपराक देत अस्मान दाखविले.


पुणे पदवीधर हा भाजपचा  सलग गेली 12 वर्षे ताब्यात असलेला मतदार संघ.तर याच ठिकाणी  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दोनदा तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनदा या मतदार संघातून विजय मिळविला होता. 24 वर्षे हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात होता. गतवेळी राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. या पराभवातून धडा घेतलेल्या राष्ट्रवादीने प्रमुख इच्छुकांना थांबवित अरुण लाड यांच्यामागे एकमुखी शक्ती उभी केली. दिमतीला कॉग्रेस व शिवसेनेची फौज होती. महाविकास आघाडीची ताकद एकवटल्याने राष्ट्रवादीच्या विजयाची वाट सुकर झाली. अरुण लाड यांनी 1 लाख 22145 मते मिळविताना पहिल्या पसंतीचा 1 लाख 14137 मतांचा कोटा पूर्ण केला. भाजपचे संग्राम देशमुख यांना 73321 मतांवर समाधान मानावे लागले. लाड यांनी 48 हजार 823 मतांची आघाडी घेत देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला या निवडणुकीत भाजपने मोठा फौजफाटा रिंगणात उतरविला होता. जोडीला राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाची यंत्रणा होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः निवडणुकीची सुत्रे हाती घेतली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रचारात उडी घेतली होती. बुथ पातळीवरदेखील भाजपने खास यंत्रणा उभी केली होती. पुण्यातील प्रबळ दावेदार राजेश पांडे यांना प्रचारप्रमुख करताना डॉ. राजेंद्र खेडकर यांचे बंड शमविले. प्रचारात आत्मविश्वास दिसत होता. मात्र उसने अवसान आणून केलेला प्रचार भाजपला तारु शकला नाही.

निवडणुकीच्या प्रचारात वापरलेली भाषा सुशिक्षित मतदारांना आवडली नाही,राजकीय विरोध करायचा असतो पण टीका करताना प्रचाराची पातळी सोडायची नसते,नेमके हेच त्याचे चुकले आणि याचाच फायदा महाविकास आघाडीने उचलला, टिकेकडे लक्ष न देता प्रचारात लक्ष केंद्रित केले खुलासे करत बसण्यापेक्षा एका एका मतदाराला गाठून त्याला आपल्या कडे वळविले म्हणूनच सुमारे 48 हजाराच्या फरकाने विजय मिळवला.


खरे तर ही निवडणूकित अरुण लाड- संग्राम देशमुख असा सामना नव्हताच ते आपापल्या पक्षानी दिलेले चेहरा होता . खरा सामना होता तो दोन प्रदेशाध्यक्ष याच्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात राष्ट्रवादीचे पाटील भाजपच्या पाटलांना भारी पडले. राष्ट्रवादीने भाजपची हॅटट्रीक रोखत चंद्रकांत पाटील यांना धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) अशा मात्तबर नेत्यांनी झंझावती प्रचार केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात हात घालून काम केल्याने पदवीधर व शिक्षकमध्ये महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला.

 

भाजप बंडखोरी रोखू शकली. मात्र असंतुष्ठांचा असंतोष, भाजपेयींची खदखद रोखू शकली नाही.या उलट महाविकास आघाडीने आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला या प्रचार यंत्रणेत कमळ लावले व नेत्यांनी उमेदवार कोण आहे हे पाहू नका,तर मीच उभा आहे असे समजून काम करा, पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता महत्वाच्या असतो आणि जो झटतो त्याला संधी देणे गरजेचे असते येथेच भाजपा चुकली आयातांना उमेदवारी देण्याचा पायंडा मुळच्या कार्यकर्त्यांना पचलेला नाही. पदवीधर व शिक्षकची पुण्यात सर्वाधिक मतदारांची नोंदणी झाली होती. या वाढीव मतांवर भाजपची भिस्त होती. मात्र अपेक्षित मतदान खेचण्यात भाजपची यंत्रणा अपुरी पडली. कोथरुडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आपल्या इच्छेला मुरड घातली होती. चंद्रकांत पाटील यांच्या विधानसभेतील प्रवेशानंतर पदवीधरच्या जागेवर कुलकर्णी यांचाच प्रबळ दावा होता. त्या बरोबरच मतदान नोंदणी मध्ये चंद्रकांत दादाचे विश्वासू म्हणून ज्यांना ओळखले जात होते ते म्हणजे सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चारेगावकर मात्र त्यांना डावलून सांगली जिल्ह्यात दिलेली उमेदवारी भाजपच्याच कार्यकर्त्यांना पसंत पडली नव्हती. दुसरीकडे सलग बारा वर्षे भाजपच्या ताब्यात आमदारकी असताना आपले प्रश्न कायम असल्याची भावना पदवीधरांमध्ये निर्माण झाली होती
संग्राम देशमुख यांच्यासाठी फडणवीस यांच्यासह भाजपच्या धुरिणांनी जंग जंग पछाडलं. मात्र राष्ट्रवादीच्या पॉवरफूल फळीपुढे भाजपची जादू चालली नाही. सांगली जिल्ह्यातील भाजपचे नेते देशमुख यांच्या व्यासपीठावर होते. मात्र पक्षांतर्गत गटबाजी लपून राहीली नाही.देशमुख यांच्या साखर कारखान्याने शेतकर्‍याचे पैसे थकविल्याचा विरोधकांचा आरोप भाजपसाठी आणखी अडचणीचा ठरला. या उलट अरुण लाड यांना वडील क्रांतिअग्रणी जी. डी. लाड यांचा असलेला वारसा, साखर कारखान्याचा उत्तमरितीने सांभाळलेला कारभार, सर्वसमावेशक व संयमी चेहरा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, राष्ट्रवादीच्या गटातंटानी मतभेद बाजूला ठेवून एकजिनसीपणे केलेला प्रचार राष्ट्रवादीच्या कामी आला