मलकापुरात शनिवारपासून आठवडाभर जनता कर्फ्यू

मलकापुरात शनिवारपासून आठवडाभर जनता कर्फ्यू
जनता कर्फ्यु लागू करण्यासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत बोलताना उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व उपस्थित मान्यवर

सर्वपक्षीय बैठकीत निर्णय : दोन टप्यात जनता कर्फ्यू, व्यापारी, नागरिकांनी सहकार्य करण्याचे मनोहर शिंदे यांचे आवाहन

कराड/प्रतिनिधी :

        मलकापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची ही साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांचा एकमेकांशी संपर्क होऊ नये, यासाठी शहरात जणता कर्फ्यू लागू करण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षिय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आठवडाभर मलकापुरात जनता कर्फ्यू लागू करण्यावर एकमत झाले आहे. दोन टप्यात हा बंद असणार असून पहिल्या टप्प्यात शनिवारी  12 ते मंगळवारी 15 व बुधवारी 16 ते शनिवारी 19 या कालावधीत शहरातील दुकाने बंद ठेवणेत येणार आहेत.

         या बंदच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी 12 ते मंगळवारी 15 रोजी दरम्यानच्या कालावधीत सर्व आस्थापना व अत्यावश्यक सेवेमधील दवाखाने, मेडिकल्स, दुध विक्री केंद्र सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये बुधवारी 16 ते शनिवारी 19 या कालावधीत सर्व आस्थापना,  दुकाने व अत्यावश्यक सेवा सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील. यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष श्री. मनोहर शिंदे केले आहे.