मनोजदादा यांच्याकडून ग्रामपंचायतींना मोफत औषधे वाटप

कराड उत्तरमधील ग्रामपंचायत यांना गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी जि.प.सदस्य मा.मनोजदादा घोरपडे यांच्या वतीने सोडियम हायप्रो क्लोराईड हे ग्रामपंचायतींना मोफत वाटप करण्यात आले आहे.

सातारा - कराड उत्तरमधील ग्रामपंचायत यांना गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी जि.प.सदस्य मा.मनोजदादा घोरपडे यांच्या वतीने सोडियम हायप्रो क्लोराईड हे ग्रामपंचायतींना मोफत वाटप करण्यात आले आहे.
         आज संपूर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये कोरोना सारख्या महामारीने थैमान घातला असून त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून आज प्रत्येक गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत असून प्रत्येक गावास मागणीनुसार 1% असलेले सोडियम हायप्रो क्लोराईड  औषध फवारणीसाठी देण्यात येत असून प्रत्येक व्यक्तीने स्वतःची व समाजाची काळजी करण्याची गरज असून सरकारने दिलेले नियम पाळून लोकांनी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन मा.मनोजदादा यांनी केले आहे.