गणेशनगर वासीयांना आरोग्य विभागाचा मायेचा आधार शंभर कुटुंबाना दिले डाळ आणि तांदूळ

गणेशनगर कोर्टी ता.कराड येथील कातकरी समाजाची अंदाजे शंभर कुटुंब रहात आहेत,त्यांना अद्याप मुलभुत सुविधा पासून वंचित रहावे लागत आहे.मोलमजुरी, मासेमारी यातून उदरनिर्वाह होत आहे. परंतु सध्या कोरोना जागतिक महामारी संकटाशी मुकाबला करताना संपुर्ण लॉकडाऊन केले असल्यामुळे या लोकांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

उंब्रज/प्रतिनिधी

रोजगार बंद, बाजार बंद या मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.अशी माहिती श्रीमती सपना शिंदे सिस्टर आरोग्य सेविका उंब्रज यांना समजल्यावर, प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज मार्फत आरोग्य सेवे सोबत डॉक्टरांचे रूपातली माणूसकीच्या नात्याने सर्व स्टाफ यांनी मिळून  तांदूळ आणि डाळ जमा केला, आणि कातकरी समाजातील  लोकांना प्रत्येकी एक किलो तांदूळ आणि डाळ वाटप करण्यात आले, तसेच गणेश थोरात यांचे वतीने शेतातील घेवड्याच्या शेंगा वाटप करण्यात आल्या.या उपक्रमाबद्दल रहिवासी लोकांनी आभार मानले