उंब्रज ग्रामपंचायती कडून जंतूनाशक फवारणी

उंब्रज ग्रामपंचायतीच्या वतीने "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सुरू केल्या असून रविवारी उंब्रज गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही फवारणी करण्यात आली,सर्वच्या सर्व सहा वॉर्ड मध्ये फवारणी करण्यात येणार आहे.

उंब्रज ग्रामपंचायती कडून जंतूनाशक फवारणी

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ग्रामपंचायतीच्या वतीने "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सुरू केल्या असून रविवारी उंब्रज गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही फवारणी करण्यात आली,सर्वच्या सर्व सहा वॉर्ड मध्ये फवारणी करण्यात येणार आहे.

उंब्रज ता.कराड येथील नागरी वस्तीत फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांची होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्यात  भीतीचे वातावरण निर्माण होऊन विविध उपाययोजना करण्याचा दृष्टीने ग्रामपंचायतने पावले उचलली आहेत. रविवारी सकाळी ट्रॅक्टर मशीनच्या साहायाने फवारणीचा सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच लता कांबळे, उपसरपंच अजित जाधव, ग्रामसेवक चव्हाण  उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्रापासून फवारणीचे काम सुरू करण्यात आले त्यानंतर दिवसभरात सर्व नागरी वस्तीमध्ये फवारणीची अमलब करण्यात आली