पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी

पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी

उंब्रज/प्रतिनिधी


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पाल, ता. कराड, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणेबाबत.शासन निर्णय क्रमांकः स्थापना-२०२२/ प्र.क्र.२६९/ आरोग्य-४
मंत्रालय, १० वा मजला, संकुल इमारत,मुंबई.यांनी दि ०६ डिसेंबर, २०२२.रोजी सहसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र क्रमांकः जा.क्र. संआसे / कक्ष ७अ /टे-८/पाल / सातारा
/प्राआकेंद्र/स्थापना/५९७-९९, दि.१०/०२/२०२२ नुसार मान्यता दिली आहे.यामुळे स्वतंत्र आरोग्य केंद्राची पाल ग्रामस्थांची मागणी मान्य झाली आहे.सदरची मंजुरी १० फेब्रुवारी २०२२ च्या मागणी पत्राच्या अनुषंगाने देण्यात आल्याचे जावक क्रमाकांत नमूद करण्यात आले आहे.

आदेशामध्ये नमूद केल्यानुसार पाल ता. कराड, जि. सातारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणेबाबत मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात प्रशासकीय स्थरावर निर्णय घेताना प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणेबाबत मान्यता देण्यात आली आहे.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१११५१२२३५२७५१७ असा आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.

या आदेशाच्या प्रती उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर.जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रूग्णालय, सातारा.जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा.निवडनस्ती ( आरोग्य-४), सा.आ.वि.सहाय्यक संचालक (लेखा व लेखापरिक्षा), आरोग्य सेवा, पुणे.सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), पुणे.यांना माहितीसाठी पाठविण्यात आला आहेत