मुख्यमंत्र्यांच्या कराड दौऱ्यात पालिकेची पायाभरणी,भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा झोकाळला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना भारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात रंगले शह-कटशाहचे राजकारणःपालिकेची झाली पेरणी

मुख्यमंत्र्यांच्या कराड दौऱ्यात पालिकेची पायाभरणी,भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा झोकाळला

काही दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला. मात्र त्यांच्या या दौर्‍यात कराड तालुक्यामध्ये कोणीही गळाला लागले नाही, याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र पहिल्यांदा कराडात आले आणि बरेच काही जिंकून गेले. त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेला मात्र कराड पालिकेच्या निवडणूकीत दमदार ऍन्टी मिळण्यासाठी मोठा गट मिळाला. त्यामुळे भाजपला भारी ठरले शिंदे असे म्हणण्याची वेळ आली असली तरी शहकटशाहच्या राजकारणाने त्यांचा दौरा मात्र वादादित झाला. केवळ भेटीच्या कारणाणे विकासकामांना आड येण्याचा टपका मात्र ते घेवून गेले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसापूर्वी त्यांनी तालुक्याचा दौरा केले त्यांच्या कराडच्या दक्षिण आणि उत्तर या दोन्ही विधानसभेच्या मतदार संघावर आपला दावा केला. हे करण्यासाठी रात्रीस खेळ सुरू ठेवला कोअर टिमच्या बैठका घेतल्या. कानपिचक्या दिल्या आणि ज्यांनी घोषणा केल्या त्या मात्र फ ोल ठरल्या. कोणीही त्यांच्या गळाला लागले नाही. दक्षिणेत धनगर समाजाचा मेळावा घेवून ढोल बडविला व आपलेच बाबा आमदार होणार असा दावा केला. खरे तर भाजपाची तळागळातील प्रचार यंत्रणा अत्यंत मजबूत असते, पण कराड तालुक्यात अंतर्गत मतभेद मात्र मोठ्या प्रमाणात आहेत. ते मिटविण्याचा प्रयत्न म्हणून की काय रात्रीची कोअर कमिटी बैठक कली मात्र        फलित काय हाती लागले हे समजले नाही. याठिकाणी कांगाळ्या मात्र जास्त झाल्याची चर्चा आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कराडात मोठा दौरा केला.या दौैर्‍यात स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेबांच्या समाधी स्थळी जाताना कन्या शाळेजवळ उभ्या असलेल्या मुलींना पाहुन त्यांचा ताफ ा अचाणक थांबला मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या बरोबर चर्चा केली आणि ते पुढे रवाणा झाले.प्रीतिसंगम बागेत मुख्यमंत्री भजण एैकण्यासाठी बसले होते, त्यानंतर त्यांनी उठून जाताना भजनीमंडळाबरोबर चर्चा केली व फ ोटो काढला तर जाताना त्यांचा ताफ ा निघाला काही अंतरावरच एक महिला ओरडली व गाडीचा ताफ ा जागेवरच थांबला मुख्यमंत्र्यांनी या महिलेशी चर्चा करत त्यांची कागदपत्राची फ ाईल घेतली यावेळीतर पालकमंत्री गाडीतून खाली उतरून आक्रोश करणार्‍या महिलेची समजूत घालत होते. 

मुख्यमंत्री दिवसभर फिरत असताना त्यांनी कोठेही आपल्या गाडीची काच बंद केली नाही. सर्वाना हात करत त्यांनी दौरा आटपला.मुख्यमंत्र्यांचे शासकीय कार्यक्रम जाहिर झाले होते त्यानुसार ते पार पडले पण या दौर्‍यात शह-कटशहाचे राजकारण झाले. त्यामुळे थोडा वादातितच ठरला खरेतर विकासाची कामे म्हहत्वाची असतात पण या विकासाच्या कामाला बगल देत केवळ कोणाला तरी समाधान वाटावे म्हणून दौराच बदलणे हे सर्वसामान्य जनतेच्या किती फ ायद्याचे असा सवालच जनता करू लागली आहे. ज्यांनी कोणी हे घडवले त्यांना याचे श्रेय लाटायचे असावे! परंतु ये पबलिक हे सब जानती है अशी वेळ आपणावर येवू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍यात जसे ते दिलखुलास दिसले तसा त्यांचा मेळावाही दिमाखदार झाला. कराडच्या भविष्याच्या राजकारणाचा वेध घेणारा ठरला. यामुळे येणार्‍या निवडणूकीत शिंदे गटाची ताकद दिसणार आहे तिचा फ ायदा की तोटा हे निवडूकी नंतर समजेल. पण सध्यातरी कराडच्या राजकारणाला सुर सापडल्याचे दिसत आहे. पाहूया काय घडते ते...!

मुख्यमंत्र्यांचा दौरा तीन वेळा बदलला

राजात सत्तांतर झाले असून शिंदे गट आणि भाजपची सत्ता आहे. कराडला प्रथमच येणारे मुख्यमंत्री कोण कोणत्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार याबाबत उत्सुकता होती. संभाव्य आणि अधिकृत दौरा निश्चित होत असताना त्यात तीन वेळा बदल झाला. गुरुवारी 24 रोजी रात्री अधिकृत दौरा निश्चित झाला. काही कार्यक्रम रद्द झाले. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी झणझणीत मेजवानी

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कराडला येत आहेत. त्यामुळे सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांच्या सरबराईची जबाबदारी घेतली आहे. मरळी कारखान्यावरून मटण आणि झणझणीत रस्सा बनवून आणला होता. तळलेली पापलेट आणि सुरमई तसेच फुलके, भाकरी असा मेनू  ठेवण्यात आल्याची चर्चा याठिकाणी होतीे.

अत्याधुनिक विश्रामगृह

कराडचे नवीन विश्रामगृह सुमारे 25 कोटी खर्च करून  बांधले आहे. याचे काल आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. आणि याठिकाणी मंत्र्यांसाठी  उत्तम प्रकारे जेवण करण्यात आले होते. हे विश्रामग्रह पाहिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी या कामाचे कौतुक करत शंभूराज देसाई यांच्या कडून याबाबत माहिती घेतली.

आय.जी. भडकले

काल विश्रामग्रहाचे उद्घाटन झाले आणि मुख्यमंत्री आत गेले त्यावेळी कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आत घुसले होते.त्यावेळे पालीस महासंचालक या ठिकाणी आले. आणि तेथे असलेल्या अधिकार्‍यांना विचारणा केली जे लोक आत आले आहेत, त्यांच्या कडे पासेस आहत का? मुख्यमंत्र्यांना खास सुरक्षा असताना अशी गर्दी झाली कशी असे म्हणत ते चांगलेच भडकले आणि काही वेळातच आत घुसलेल्या सर्व समर्थकांना बाहेरचा सस्ता दाखविला.