कराड व्हाया उंब्रजकडे गेलेला मटका बुकी कोण ?

कराड व्हाया उंब्रजकडे गेलेला मटका बुकी कोण ?

कराड व्हाया उंब्रजकडे गेलेला मटका बुकी कोण?

कराड/प्रतिनिधीः-


कराड शहरामध्ये मटक्याच्या व्यवसायातून गँगवॉर घडले. यामध्ये गोळीबार करून एकाचा खून झाला. त्यानंतर काही कालखंड बंद असलेला मटका महिन्याभरातच सुरू झाला. मात्र, हा मटका घेणार्‍यांनी तो कराड व्हाया उंब्रजला नेला. उंब्रजला ज्या बुकीकडे कराडात छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यवसायीक ज्याच्याकडे ही चिठ्ठी फिरवत होते. तो मटका किंग कोण? याचा शोधही कराड पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. कराडचा मटका शहर अशांत झाल्यानंतर उंब्रजकडे वळलाच कसा? असा सवाल अनेकजण करत आहेत.


कराड शहरामध्ये जे मटका बुकी बुकी म्हणून काम करत होते. त्यांच्यात आणि येथील एका टोळीत गँगवॉर झाले. यामध्ये गोळीबार झाला आणि त्यामध्ये पवन सोळवांडेची हत्या झाली. या हत्येनंतर शांत कराड पुन्हा अशांत झाले. शहरातील अवैद्य व्यवसायावर असलेली पोलिसांची पकड ढिली झाल्यामुळेच ही घटना घडली. त्यानंतर काही दिवस शहरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अनेकजणांना ताब्यात घेतले. तर मटक्यातील व्यवसायिकांची धरपकड करत त्या टोळीवर मोक्का लावला आणि त्यांना जेरबंद केले. त्यानंतर शहरात शांतता निर्माण झाली. महिन्याभराचा कालखंड उलटतो न उलटतो तोच छोटे व्यवसायिक आडाला बसून पानटपर्‍या शेजारी पायर्‍यावर बसून मटक्याच्या चिठ्ठ्या घेवू लागले. या मटक्याच्या चिठ्ठया कोणत्या बुकीकडे फिरवतात. यावर अनेक खलबत्ते झाले. मात्र, पोलिसांची असलेली करडी नजर आपल्यावर फिरू नये म्हणून या महाशयाने या मटक्याच्या चिठ्ठ्या चक्क कराड व्हाया उंब्रजला पोहोचवल्या आणि शहरातील मटका बुकी उंब्रजमध्ये उदयास आला. तो कोण? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. जो उंब्रजमध्ये बसून मटका घेत होता. तो कराडातील तरी कोणी नव्हता ना? याचा शोध पोलिसांनी घ्यावा.


कराड शहरात आता पुन्हा मटक्याने तोंड वर काढले आहे. अवैद्य व्यवसाय राजरोस सुरू झाले आहेत. काही पानटपर्‍या बंद काळातही अर्धवट उघडून हा व्यवसाय करताना दिसत होत्या. यांना अभय कोणाचा आहे. शहरातील मटका बुकी मोक्कांतर्गत अटकेत आहेत. मग शहरात नवीन बुकी निर्माण झाला कोण?  आणि तो कोणाच्या आश्रयाखाली आहे ? याची सखोल चौकशी जिल्हा पोलिस प्रमुखांनी करावी आणि कराड अशांत बनणार नाही याची खबरदारी घ्यावी. नाहीतर येरे माझ्या मागल्या... अशी परिस्थिती निर्माण होईल.