कराड तालुक्याला दिवसातला दुसरा धक्का,अजून सातजण बाधित

आज एकाच दिवसात १२ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कराड तालुक्याला दिवसातला दुसरा धक्का,अजून सातजण बाधित

कोरोना बाधिताचे निकट सहवासित म्हणून दाखल केलेल्या सात नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा दि. 25( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले 7 नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

प्राथमिक तपासण्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागु असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालु असल्याची माहितीही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

 

*कराडला आज हाहाकार*

*सातारा जिल्हा रुग्ण - 33*

*सातारा - 8*
*कराड - 24*
*फलटण - 1*

*मृत्यू - 2*
*कोरोना मुक्त - 3*

सध्या अ‍ॅडमिट - 28