तळीरामांची दैना,देशी विदेशी दारू महागली,अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट

उंब्रज परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश बंदिस्त असतांना देखील 'तळीरामां'ना काही दम पडेना उंब्रजसह खेड्या पाड्यात मद्यपी लपून छपून देशी विदेशीचा घुटका घेत आहेत. याचा मोठा फायदा भुरट्या तसेच सराईत मद्य विक्रेत्यांना होतांना दिसतोय अनेक ठिकाणी मद्य विक्रेते भाव वाढवून मद्य विक्री करत असून जी देशी दारूची बाटली आधी ५० रुपयांना विकली जायची ती आता २५० रु. ला विकली जात आहे.तर विदेशीची क्वार्टर ही ५०० पार करून पुढे गेली आहे.

उंब्रज/प्रतिनिधी

मद्य विक्रेते एका बॉटल मागे दाम तिप्पट रक्कम अधिक उकळतायत. केवळ मद्य नाही तर सिगारेट,गुटखा तंबाखू या सारख्या व्यसनांचे देखील भाव विक्रेत्यांनी वाढवले आहे. एकीकडे सामान्य नागरिक जीव मुठीत धरून कोरोना सारख्या भयावह महामारीचा प्रकोप कमी होण्याची वाट बघत आहे. तर दुसरीकडे या व्यसनींची वेगळीच धूम सुरु आहे.

सुरक्षा यंत्रणेचे कर्मचारी कोरोनाशी लढा देण्यात व्यस्त असल्याचा फायदा मद्य विक्रेते घेत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक मद्य विक्रेते विना परवाना ही विक्री करत आहे. तंबाखू आणि सिगारेटचे दर देखील गगनाला भिडले आहेत.७ रुपयाला मिळणारी इब्राहिम तंबाखूची पुडी आता १५ रुपयाला विकली जात आहे.तर गायछापचा १ पुडीचा दर २० रुपयाला टेकला आहे.