राज आणि मुद्रा ?

मनसेची स्थापना झाली, त्यानंतर मनसेचे १३ आमदार कार्यरत होते. परंतु आज एकाच आमदार पक्षाकडे असून राज ठाकरे यांच्याकडून लोकांची जी  अपेक्षा होती, ती कमी झाल्याचे दिसत आहे. आता मनसेचे काय धोरण असणार, मनसे जागृत राहणार काय हे पहावे लागेल. 

राज आणि मुद्रा ?

कृष्णाकाठ / अशोक सुतार 

मनसेच्या नवीन ध्वजावरून राज्यात मनसेला मोठा विरोध होणार असल्याचे दिसत आहे. शिवरायांची राजमुद्रा राजकीय पक्षाने आपल्या ध्वजावर मिरवणे, ही  मनसेची कृती शिवप्रेमींना आवडेल असे नाही. मनसेची हिंदुत्वाकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांच्या ध्वजावरून दिसून येत आहे.. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा कात टाकली असून झेंड्याचा रंग बदलण्यापासून पक्षामध्ये विविध गोष्टींचा बदल घडवून आणला आहे. मनसेचे महाअधिवेशन स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पार पडले असून त्यात विविध गोष्टींचा उहापोह करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले आहे. मनसेच्या जुन्या झेंड्यावर निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग होते. या ध्वजावर मनसेचे निवडणूक चिन्ह रेल्वेइंजिन होते.   आता झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे आणि ध्वजाचा रंग भगवा किंवा केशरी आहे. परंतु यावर महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजी ब्रिगेडने मनसेने झेंड्यात शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर केल्याने विरोध दर्शवला आहे. राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करावी अशी मागणी करणारे पत्र त्यांनी पुणे पोलिसांकडे दिले आहे. गुन्हा दाखल न केल्यास संभाजी ब्रिगेड स्टाइलने आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मनसेच्या नवीन ध्वजावरून राज्यात मनसेला मोठा विरोध होणार असल्याचे दिसत आहे. शिवरायांची राजमुद्रा राजकीय पक्षाने आपल्या ध्वजावर मिरवणे, ही  मनसेची कृती शिवप्रेमींना आवडेल असे नाही. मनसेची हिंदुत्वाकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांच्या ध्वजावरून दिसून येत आहे. परंतु शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, हिंदुत्व हा सामाजिक प्रश्नांना टक्कर देण्याचा विषय होऊ शकत नाही. काही जणांना पालवी फुटत आहे, परंतु शिवसेनेला तोड नाही, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. मनसेची स्थापना झाली, त्यानंतर मनसेचे १३ आमदार कार्यरत होते. परंतु आज एकाच आमदार पक्षाकडे असून राज ठाकरे यांच्याकडून लोकांची जी  अपेक्षा होती, ती कमी झाल्याचे दिसत आहे. आता मनसेचे काय धोरण असणार, मनसे जागृत राहणार काय हे पहावे लागेल.                                                                   शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर राज ठाकरे ही शिवसेनेतून बाहेर पडले आणि काही कालावधीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. सुरुवातीला राज यांनी बाळासाहेबांची प्रतिमा वापरत मनसेचे कार्य करण्यास सुरु केले, त्यावेळी शिवसेनेने त्याला विरोध केला. नंतर राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची प्रतिमा लावली आणि मनसेची घोडदौड सुरु झाली. अल्पावधीतच मनसे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. राज ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी जमू लागली. राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेचे सुरुवातीला तब्बल १३ आमदार निवडून आले. राज ठाकरे महाराष्ट्राचा कायापालट करतील, अशी अपेक्षा अजूनही अनेकांच्या मनात आहे.परंतु मनसेचे अध्यक्ष भाषण खूप चांगले करतात, त्याचे मतात रुपांतर होत नाही. मनसेने गेली दहा वर्षांपासून आपली क्रियाशीलता सोडल्यामुळे मनसेचे राजकीय नुकसान झाले आहे. मनसेच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन पक्ष केव्हाच पुढे गेले आहेत. त्याची कसर राज ठाकरे कशी भरून काढणार आहेत. राज ठाकरे यांनी मनसेच्या अधिवेशनाचे निमित्त साधून मनसेला नव्याने र्जाकारणात सक्रीय केले आहे. परंतु पुढील वात अवघड आहे.                                                                            मनसेच्या ध्वजावरील शिवरायांच्या राजमुद्रेबाबत राज्यात खळबळ माजली आहे. संभाजी ब्रिगेड मनसेच्या विरोधात त्यामुळेच उभी राहिली आहे.संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाने राजमुद्रेचा वापर करणे चुकीचे असून प्रांत, भाषा, जात-धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या  मनसे राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मनसेविरोधात गुन्हा दखल केला नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे.
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
अर्थ – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे. असा खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते.शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारे राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. मनसेने ध्वजावरील रंग बदलला आहे, याचा अर्थ मनसे येथून पुढे हिंदुत्ववाद जोपासणार आहे काय, असा गोंधळ लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. कदाचित मनसेला असे दाखवायचे असेल की, शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यामुळे आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लढणार आहोत. त्यात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज ठाकरे यांचा दोस्ताना वाढला आहे, असे म्हणतात.                                                                                           स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर जे हिंदुत्व देशाला अभिप्रेत होते तो विचार बाळासाहेबांनी रुजवला. काही लोकांना पालवी फुटतेय. ती फुटूं दे, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही असे शिवसेना नेते  संजय राऊत यांनी महानत मनसेवर टीका केली आहे. मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या रुपाने आणखी एक ठाकरे राजकारणाच्या मैदानात उतरवले आहेत. अमित ठाकरे हे आता राजकारणात काही वेगळा प्रयोग करणार का,  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमित ठाकरे यांनी काही रोड शो वगैरे केले होते. मनसेचा प्रचारही त्यांनी त्यांच्या शैलीत केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असते. कार्यकर्त्यांसोबत बसून ते राज ठाकरे यांचे विचार ऐकतात. कार्यकर्त्यांसोबत राहून काम करण्यावर त्यांच्या अधिक विश्वास आहे. अमित राज ठाकरे यांची आज अधिकृतरित्या राजकारणात पदार्पण झाले  आहे. आता ते काय करीश्मा घडवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन गुरुवारी गोरेगाव येथील नेस्को संकुलात झाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी १० सभा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी मागणी केली होती. मात्र देशात ३०३ जागा मिळवत पुन्हा भाजपाचीच सत्ता आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणीही त्यांनी केली होती. आता एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर मनसेने भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत, असे दिसते. मनसेचे अध्यक्ष कुठेतरी गोंधळत आहेत. शिवसेनेचे सरकार राज्यात सत्तेवर येताच राज ठाकरे यांची राजकीय भूमिका बदलली आहे, असे दिसते.