भारत आणि भूतान मध्ये 9 करारांवर स्वाक्षऱ्या, मोदी म्हणाले - दोन्ही देश एकत्रितपणे पुढे जात आहेत

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत आणि भूतानमध्ये हायड्रो पॉवर प्रोजेक्ट, नॉलेज नेटवर्क, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, स्पेस सॅटेलाइट, रुपे कार्डच्या वापरासह 9 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी भूतानचे पंतप्रधान डॉ.लोते शेरिंग यांची संसदेत भेट घेतली. दरम्यान मोदी येथील भारतीय समुदायांशी देखील भेटले. यावेळी 'भारत माता की जय' आणि 'मोदी जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. थिंपूच्या पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान लोते शेरिंग यांनी मोदींचे स्वागत केले. मोदींनी विमानतळावरच 'गार्ड ऑफ ऑनर' पुरस्कार देण्यात आला.भूतानच्या विकासाला गती देण्यासाठीवचनबद्धआहोत - मोदीयावेळी मोदी म्हणाले, '' आपल्या नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरवण्यास डॉ.शेरिंग यांचे प्राधान्य आहे. आम्ही मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स तयार करण्यात त्यांची मदत करू. अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूतानच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. दोन्ही देश छोटे उपग्रह तयार करतील. रॉयल भूतान विद्यापीठ आणि भारताच्या आयआयटी यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.''पाच प्रकल्पांचे केले उद्घाटनयावेळी दोन्ही देशांमध्ये आरोग्य, ऊर्जा, अवकाश उपग्रह, ज्ञान, रुपे कार्डचा वापर यांसह 9 करार झाले. पंतप्रधान मोदी आणि शेरिंग यांनी इस्त्रोचे ग्राउड स्टेशन, मेंगदेछू जलविद्युत प्रकल्पासह 5 प्रकल्पांचे उद्घाटन केले. दरम्यान मोदींनी भारतीय रुपे कार्ड लॉन्च केले. यापूर्वी सिंगापुरमध्ये रुपे कार्ड लॉन्च करण्यात आले आहे.दोन्ही देशांतील मैत्रीसंबंधाला बळकटी मिळेल - मोदीविदेश दौऱ्यापूर्वी मोदी म्हणाले की भूतानच्या नेतृत्त्वातून झालेला संवाद अर्थपूर्ण ठरेल आणि दोन्ही देशांतील मैत्रीसंबंध आणखीन बळकट होतील. भारत त्याच्या शेजारील भूतानशी असलेल्या संबंधांना किती महत्त्व देतो हे मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळाच्या सुरूवातीस झालेल्या या दौऱ्यातून हे लक्षात येते. मोदींचा हा दुसरा भूतान दौरा आहे. यापूर्वी 2014 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी भूतानला गेले होते. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Nine agreements sign between India and Bhutan


 भारत आणि भूतान मध्ये  9 करारांवर स्वाक्षऱ्या, मोदी म्हणाले - दोन्ही देश एकत्रितपणे पुढे जात आहेत

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत आणि भूतानमध्ये हायड्रो पॉवर प्रोजेक्ट, नॉलेज नेटवर्क, मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, स्पेस सॅटेलाइट, रुपे कार्डच्या वापरासह 9 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी भूतानचे पंतप्रधान डॉ.लोते शेरिंग यांची संसदेत भेट घेतली. दरम्यान मोदी येथील भारतीय समुदायांशी देखील भेटले. यावेळी 'भारत माता की जय' आणि 'मोदी जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. थिंपूच्या पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान लोते शेरिंग यांनी मोदींचे स्वागत केले. मोदींनी विमानतळावरच 'गार्ड ऑफ ऑनर' पुरस्कार देण्यात आला.

भूतानच्या विकासाला गती देण्यासाठीवचनबद्धआहोत - मोदी

यावेळी मोदी म्हणाले, '' आपल्या नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरवण्यास डॉ.शेरिंग यांचे प्राधान्य आहे. आम्ही मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स तयार करण्यात त्यांची मदत करू. अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूतानच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. दोन्ही देश छोटे उपग्रह तयार करतील. रॉयल भूतान विद्यापीठ आणि भारताच्या आयआयटी यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.''


पाच प्रकल्पांचे केले उद्घाटन
यावेळी दोन्ही देशांमध्ये आरोग्य, ऊर्जा, अवकाश उपग्रह, ज्ञान, रुपे कार्डचा वापर यांसह 9 करार झाले. पंतप्रधान मोदी आणि शेरिंग यांनी इस्त्रोचे ग्राउड स्टेशन, मेंगदेछू जलविद्युत प्रकल्पासह 5 प्रकल्पांचे उद्घाटन केले. दरम्यान मोदींनी भारतीय रुपे कार्ड लॉन्च केले. यापूर्वी सिंगापुरमध्ये रुपे कार्ड लॉन्च करण्यात आले आहे.

दोन्ही देशांतील मैत्रीसंबंधाला बळकटी मिळेल - मोदी
विदेश दौऱ्यापूर्वी मोदी म्हणाले की भूतानच्या नेतृत्त्वातून झालेला संवाद अर्थपूर्ण ठरेल आणि दोन्ही देशांतील मैत्रीसंबंध आणखीन बळकट होतील. भारत त्याच्या शेजारील भूतानशी असलेल्या संबंधांना किती महत्त्व देतो हे मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळाच्या सुरूवातीस झालेल्या या दौऱ्यातून हे लक्षात येते. मोदींचा हा दुसरा भूतान दौरा आहे. यापूर्वी 2014 मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी भूतानला गेले होते.




Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Nine agreements sign between India and Bhutan