जम्मू-काश्मिरवरील निर्णयानंतर पाकिस्तानात खळबळ, राष्ट्रवतींनी तातडीने बोलावले संयुक्त अधिवेशन

इस्लामाबाद- मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानात मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. अमित शाह यांनी घोषणा करत राज्याचा विशेष दर्जा हटवून जम्मू काश्मीरचे विभाजन करत विभाजित भागांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा केली. या निर्णयाची घोषणा होताच पाकिस्तानने मंगळवार(6 जून)ला पाक संसदेचे संयुक्त सत्र आयोजित केले.पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर आरिफ अल्वी यांनी मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेत संयुक्त सत्राची घोषणा केली. मंगळवारी सकाळी 11 वाजता हे सत्र सुरु होईल. काश्मीरमधील बदलत असलेल्या स्थितीवर या सत्रात चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानच्या सुरक्षा दलांचे प्रमुख देखील उपस्थित राहतील. पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, चीफ ऑफ द एअर मार्शल मुजाहिद अनवर खान यांच्यासह अनेक वरिष्ठ सैनिक अधिकारी या संयुक्त सत्रात सहभागी होणार आहेत.गृहमंत्री अमित शाह यांनी आज(सोमवार) राज्यसभेत 2 महत्त्वाचे विधेयक सादर केले. यात जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले जाणार आहेत. तसेच राज्याचे विभाजन करत त्याचे लडाख आणि जम्मू-काश्मीर असे 2 भाग करण्यात येतील. या निर्णयांमुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाला आहे. तसेच या भागांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Conclave in Pakistan after decision on Jammu and Kashmir,


 जम्मू-काश्मिरवरील निर्णयानंतर पाकिस्तानात खळबळ, राष्ट्रवतींनी तातडीने बोलावले संयुक्त अधिवेशन

इस्लामाबाद- मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानात मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. अमित शाह यांनी घोषणा करत राज्याचा विशेष दर्जा हटवून जम्मू काश्मीरचे विभाजन करत विभाजित भागांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा केली. या निर्णयाची घोषणा होताच पाकिस्तानने मंगळवार(6 जून)ला पाक संसदेचे संयुक्त सत्र आयोजित केले.


पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर आरिफ अल्वी यांनी मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेत संयुक्त सत्राची घोषणा केली. मंगळवारी सकाळी 11 वाजता हे सत्र सुरु होईल. काश्मीरमधील बदलत असलेल्या स्थितीवर या सत्रात चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानच्या सुरक्षा दलांचे प्रमुख देखील उपस्थित राहतील. पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, चीफ ऑफ द एअर मार्शल मुजाहिद अनवर खान यांच्यासह अनेक वरिष्ठ सैनिक अधिकारी या संयुक्त सत्रात सहभागी होणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी आज(सोमवार) राज्यसभेत 2 महत्त्वाचे विधेयक सादर केले. यात जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले जाणार आहेत. तसेच राज्याचे विभाजन करत त्याचे लडाख आणि जम्मू-काश्मीर असे 2 भाग करण्यात येतील. या निर्णयांमुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाला आहे. तसेच या भागांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Conclave in Pakistan after decision on Jammu and Kashmir,