तेलाचे टँकर उलटल्यानंतर चोरी करण्यासाठी झाली गर्दी, तेव्हाच घडला भीषण स्फोट; किमान 57 जणांचा मृत्यू

दार-अस-सलाम- तांझानियात शनिवारी झालेल्या भीषण टँकर स्फोटात एकाचवेळी 57 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दार-अस-सलाम शहरात एक भरधाव तेल टँकर नियंत्रण सुटल्याने उलटले. याचीच माहिती स्थानिकांना मिळाली तेव्हा तेल चोरण्यासाठी सर्वांनी गर्दी केली. रस्त्यावर तेल पसरले असताना अचानक एक मोठा स्फोट होऊन आगडोंब उडाला. या घटनेत किमान 57 जणांचा होरपळून मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली त्यावेळी तेलावर हात साफ करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने स्थानिकांनी गर्दी केली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, 50 हून अधिक लोकांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर ज्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. हे सगळेच मिळे त्या भांड्यात तेल चोरण्याचा प्रयत्न करत होते. पूर्व आफ्रिकी देशात तेल चोरीच्या घटना सामान्य आहेत. परंतु, अपघातग्रस्त वाहनातून तेल चोरत असताना शनिवारी मोठा स्फोट झाला. याचवर्षी जुलै महिन्यात नायजेरियामध्ये अशाच प्रकारचे एक तेल टँकर उलटले होते. त्यानंतर 45 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. 2013 मध्ये युगांडा येथील कंपालामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या एका घटनेत 29 जणांचा बळी गेला. तेल टँकर उलटताच लोकांनी ते लुटण्यासाठी केलेल्या गर्दीनंतर अशा दुर्घटना घडल्या आहेत. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Tanzania Latest News; 57 killed in fuel tanker explosion in Eastern Tanzania


 तेलाचे टँकर उलटल्यानंतर चोरी करण्यासाठी झाली गर्दी, तेव्हाच घडला भीषण स्फोट; किमान 57 जणांचा मृत्यू

दार-अस-सलाम- तांझानियात शनिवारी झालेल्या भीषण टँकर स्फोटात एकाचवेळी 57 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दार-अस-सलाम शहरात एक भरधाव तेल टँकर नियंत्रण सुटल्याने उलटले. याचीच माहिती स्थानिकांना मिळाली तेव्हा तेल चोरण्यासाठी सर्वांनी गर्दी केली. रस्त्यावर तेल पसरले असताना अचानक एक मोठा स्फोट होऊन आगडोंब उडाला. या घटनेत किमान 57 जणांचा होरपळून मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली त्यावेळी तेलावर हात साफ करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने स्थानिकांनी गर्दी केली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, 50 हून अधिक लोकांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर ज्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. हे सगळेच मिळे त्या भांड्यात तेल चोरण्याचा प्रयत्न करत होते. पूर्व आफ्रिकी देशात तेल चोरीच्या घटना सामान्य आहेत. परंतु, अपघातग्रस्त वाहनातून तेल चोरत असताना शनिवारी मोठा स्फोट झाला. याचवर्षी जुलै महिन्यात नायजेरियामध्ये अशाच प्रकारचे एक तेल टँकर उलटले होते. त्यानंतर 45 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. 2013 मध्ये युगांडा येथील कंपालामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या एका घटनेत 29 जणांचा बळी गेला. तेल टँकर उलटताच लोकांनी ते लुटण्यासाठी केलेल्या गर्दीनंतर अशा दुर्घटना घडल्या आहेत.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Tanzania Latest News; 57 killed in fuel tanker explosion in Eastern Tanzania