पांडे गावात धोम डाव्या कालव्यात पुरुषाचा मृतदेह आढळला 

पांडे गावात धोम डाव्या कालव्यात पुरुषाचा मृतदेह आढळला 

पांडे गावात धोम डाव्या कालव्यात पुरुषाचा मृतदेह आढळला 

 

वाई / दौलतराव पिसाळ 


वाई येथील धोम धरणाच्या डाव्या कालव्यातील पाण्याच्या प्रवाहा बरोबर एका अनोळखी २८ वर्षीय पुरुषचा मृतदेह  पांडे ता.वाई गावच्या हद्दीतील पेटी पुला जवळ आढळून आल्यामुळे त्याची माहिती भुईंज  पोलिस ठाण्यात समजताच भुईंज पोलिस ठाण्याचे हवलदार  आणी याच विभागाचे बिट अंमलदार असलेले बापुराव धायगुडे हे घटना स्थळावर तातडीने दाखल झाले  हवलदार बापुराव धायगुडे आणी बोपेगाव तेथील तात्या सावंत  या  दोघांनी  कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तातडीने कालव्यात उतरुन झुडपात अडकलेला मृतदेह बाहेर काढुन त्याचा कायदेशीर पंचनामा करुन तो मृतदेह शवविच्छेदना साठी कवठे ता.वाई येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात पाठविला आहे.

 

या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असुन हा पाण्या वाहत आलेला मृतदेह नक्की कुणाचा आहे याचा शोध भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली हवलदार बापुराव धायगुडे घेत आहेत