नगर : शेतजमिनीच्या वादातून चिमुकल्याचा खून

श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत आदिवासी समाजातील गणेश काळकुशा काळे (वय दोन) या चिमुकल्याचा खून झाला. या मारहाणीत मुलाचे आई-वडील काळकुशा काळे व जमा काळे गंभीर जखमी झाले. मृत मुलाची आई जमा काळे यांच्या फिर्यादीवरून नाना आघाव आणि त्याचा मुलगा व विष्णू आघाव आणि त्याचा मुलगा (नावे समजली नाहीत.) या चौघांविरुद्ध खून, तसेच ठार मारण्याचा प्रयत्न, यासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले, की जमा काळे आज दुपारी शेतात काम करत असताना त्यांचे पती काळकुशा त्यांच्याजवळ आले. त्या वेळी त्यांच्या खांद्यावर दोन वर्षांचा गणेश होता. "आपल्या जमिनीची नाना आघावने परस्पर मोजणी करून घेऊन ती त्याने ताब्यात घेतली आहे. ते आपल्या जागेत खांब लावत आहेत. आपण जाऊन त्यांना जाब विचारू,' असे पत्नीला सांगितले. काळे पती-पत्नी आघाव यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असतानाच नाना आघाव, त्याचा मुलगा, विष्णू आघाव व त्याचा मुलगा तेथे आले. "आमच्या जमिनीत काही संबंध नाही. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. यांना मारून टाका,' असे म्हणत त्यांनी काळे यांच्या हातातील सिमेंटच्या खांबाने काळे पती-पत्नीला मारहाण सुरू केली. नाना आघाव काळकुशा काळे यांना मारहाण करीत असताना त्यांच्या पत्नी मध्ये पडल्या. त्या वेळी नानाने, "यांची सगळी पुढची पिढीच संपवून टाकू,' असे म्हणत काळकुशा यांच्या खांद्यावर बसलेल्या दोन वर्षांच्या गणेशच्या डोक्‍यावर सिमेंट खांबाचा फटका जोरात मारला. त्यामुळे गणेश बेशुद्ध होऊन खाली पडला. आघाव काळकुशा काळे यांना मारहाण करीत असताना जमा काळे गणेशला उपचारांसाठी श्रीगोंद्यात घेऊन आल्या, तेव्हा डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. News Item ID: 599-news_story-1567699011Mobile Device Headline: नगर : शेतजमिनीच्या वादातून चिमुकल्याचा खूनAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:  श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत आदिवासी समाजातील गणेश काळकुशा काळे (वय दोन) या चिमुकल्याचा खून झाला. या मारहाणीत मुलाचे आई-वडील काळकुशा काळे व जमा काळे गंभीर जखमी झाले. मृत मुलाची आई जमा काळे यांच्या फिर्यादीवरून नाना आघाव आणि त्याचा मुलगा व विष्णू आघाव आणि त्याचा मुलगा (नावे समजली नाहीत.) या चौघांविरुद्ध खून, तसेच ठार मारण्याचा प्रयत्न, यासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले, की जमा काळे आज दुपारी शेतात काम करत असताना त्यांचे पती काळकुशा त्यांच्याजवळ आले. त्या वेळी त्यांच्या खांद्यावर दोन वर्षांचा गणेश होता. "आपल्या जमिनीची नाना आघावने परस्पर मोजणी करून घेऊन ती त्याने ताब्यात घेतली आहे. ते आपल्या जागेत खांब लावत आहेत. आपण जाऊन त्यांना जाब विचारू,' असे पत्नीला सांगितले. काळे पती-पत्नी आघाव यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असतानाच नाना आघाव, त्याचा मुलगा, विष्णू आघाव व त्याचा मुलगा तेथे आले. "आमच्या जमिनीत काही संबंध नाही. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. यांना मारून टाका,' असे म्हणत त्यांनी काळे यांच्या हातातील सिमेंटच्या खांबाने काळे पती-पत्नीला मारहाण सुरू केली. नाना आघाव काळकुशा काळे यांना मारहाण करीत असताना त्यांच्या पत्नी मध्ये पडल्या. त्या वेळी नानाने, "यांची सगळी पुढची पिढीच संपवून टाकू,' असे म्हणत काळकुशा यांच्या खांद्यावर बसलेल्या दोन वर्षांच्या गणेशच्या डोक्‍यावर सिमेंट खांबाचा फटका जोरात मारला. त्यामुळे गणेश बेशुद्ध होऊन खाली पडला. आघाव काळकुशा काळे यांना मारहाण करीत असताना जमा काळे गणेशला उपचारांसाठी श्रीगोंद्यात घेऊन आल्या, तेव्हा डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. Vertical Image: English Headline: Murder for a land disputeAuthor Type: External Authorसंजय आ. काटेनगरखूनवर्षापत्नीwifeपोलिसघटनाincidentsSearch Functional Tags: नगर, खून, वर्षा, पत्नी, wife, पोलिस, घटना, IncidentsTwitter Publish: Meta Description: श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत आदिवासी समाजातील गणेश काळकुशा काळे (वय दोन) या चिमुकल्याचा खून झाला. या मारहाणीत मुलाचे आई-वडील काळकुशा काळे व जमा काळे गंभीर जखमी झाले.Send as Notification: 

नगर : शेतजमिनीच्या वादातून चिमुकल्याचा खून

श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत आदिवासी समाजातील गणेश काळकुशा काळे (वय दोन) या चिमुकल्याचा खून झाला. या मारहाणीत मुलाचे आई-वडील काळकुशा काळे व जमा काळे गंभीर जखमी झाले.

मृत मुलाची आई जमा काळे यांच्या फिर्यादीवरून नाना आघाव आणि त्याचा मुलगा व विष्णू आघाव आणि त्याचा मुलगा (नावे समजली नाहीत.) या चौघांविरुद्ध खून, तसेच ठार मारण्याचा प्रयत्न, यासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले, की जमा काळे आज दुपारी शेतात काम करत असताना त्यांचे पती काळकुशा त्यांच्याजवळ आले. त्या वेळी त्यांच्या खांद्यावर दोन वर्षांचा गणेश होता. "आपल्या जमिनीची नाना आघावने परस्पर मोजणी करून घेऊन ती त्याने ताब्यात घेतली आहे. ते आपल्या जागेत खांब लावत आहेत. आपण जाऊन त्यांना जाब विचारू,' असे पत्नीला सांगितले. काळे पती-पत्नी आघाव यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असतानाच नाना आघाव, त्याचा मुलगा, विष्णू आघाव व त्याचा मुलगा तेथे आले.

"आमच्या जमिनीत काही संबंध नाही. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे. यांना मारून टाका,' असे म्हणत त्यांनी काळे यांच्या हातातील सिमेंटच्या खांबाने काळे पती-पत्नीला मारहाण सुरू केली. नाना आघाव काळकुशा काळे यांना मारहाण करीत असताना त्यांच्या पत्नी मध्ये पडल्या. त्या वेळी नानाने, "यांची सगळी पुढची पिढीच संपवून टाकू,' असे म्हणत काळकुशा यांच्या खांद्यावर बसलेल्या दोन वर्षांच्या गणेशच्या डोक्‍यावर सिमेंट खांबाचा फटका जोरात मारला. त्यामुळे गणेश बेशुद्ध होऊन खाली पडला.

आघाव काळकुशा काळे यांना मारहाण करीत असताना जमा काळे गणेशला उपचारांसाठी श्रीगोंद्यात घेऊन आल्या, तेव्हा डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

News Item ID: 
599-news_story-1567699011
Mobile Device Headline: 
नगर : शेतजमिनीच्या वादातून चिमुकल्याचा खून
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Murder for a land dispute
Author Type: 
External Author
संजय आ. काटे
Search Functional Tags: 
नगर, खून, वर्षा, पत्नी, wife, पोलिस, घटना, Incidents
Twitter Publish: 
Meta Description: 
श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत आदिवासी समाजातील गणेश काळकुशा काळे (वय दोन) या चिमुकल्याचा खून झाला. या मारहाणीत मुलाचे आई-वडील काळकुशा काळे व जमा काळे गंभीर जखमी झाले.
Send as Notification: