बिहार : 1.25 लाख लोकांना वाचवले, आसाममध्ये रेड अलर्ट; आतापर्यंत 46 मृत्युमुखी

पाटणा / गुवाहाटी - बिहार व ईशान्येतील आसामसह पाच राज्यांच्या ७२ लाख लोक पुरामुळे बेहाल झाले आहेत. बिहारच्या उत्तरेकडील परिस्थिती गंभीर झाली आहे. बुढी गंडक, गंडक व लखनदेईने धोक्याची पातळी आेलांडली आहे. त्यामुळे मुझफ्फरपूर, सीतामढी, शिवहर, दरभंगा, पूर्व पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील पुराची व्याप्ती वाढली आहे. राज्याच्या १२ जिल्ह्यांतील २६ लाख लोकांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत १.२५ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, असा दावा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. मंगळवारपर्यंत मृतांची संख्या ४६ झाली होती. आसामच्या ३३ पैकी ३० जिल्ह्यांत ४६ लाख लोक संकटाचा सामना करत आहेत. आगामी २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.केंद्राची आसामला २५१ कोटींची मदत, चेन्नईत दुसऱ्या दिवशी पाऊस- आसामचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ९० टक्के बुडाले. युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ असलेले येथील शिकारप्रतिबंधक परिसर उद्ध्वस्त झाले आहे.- मोरिगावात मदतकार्य करणारे ६५ वर्षीय सॅम्युअल, १०० वर्षांची आई व त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यात आले आहे. माझे सर्वात मौल्यवान एनआरसीचे कागद वाचले. त्याशिवाय आसाममध्ये राहता आले नसते.- केंद्राने संकटावर मात करण्यासाठी २५१ कोटी रुपयांची मदत दिली. सोबत आवश्यक मदतही मिळेल.- आसाममधील होऊ घातलेली क्रीडा स्पर्धा पुरामुळे पुढे ढकलण्यात आली. स्पर्धा १९ जुलैपासून सुरू होणार होती.- नैसर्गिक संकटाशी झुंजणाऱ्या चेन्नईत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. मंगळवारी एक सेंमी पावसाची नांेद झाली. त्यामुळे शहराला उष्णतेपासून दिलासा मिळाला.- नेपाळच्या ३१ जिल्ह्यांना पुराचा फटका. नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पुरामुळे आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला. ३२ लोक बेपत्ता आहेत. प्रशासनाने ३ हजार ३६६ लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today flood situation worsens in Assam, Bihar rain


 बिहार : 1.25 लाख लोकांना वाचवले, आसाममध्ये रेड अलर्ट; आतापर्यंत 46 मृत्युमुखी

पाटणा / गुवाहाटी - बिहार व ईशान्येतील आसामसह पाच राज्यांच्या ७२ लाख लोक पुरामुळे बेहाल झाले आहेत. बिहारच्या उत्तरेकडील परिस्थिती गंभीर झाली आहे. बुढी गंडक, गंडक व लखनदेईने धोक्याची पातळी आेलांडली आहे. त्यामुळे मुझफ्फरपूर, सीतामढी, शिवहर, दरभंगा, पूर्व पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील पुराची व्याप्ती वाढली आहे. राज्याच्या १२ जिल्ह्यांतील २६ लाख लोकांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत १.२५ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, असा दावा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. मंगळवारपर्यंत मृतांची संख्या ४६ झाली होती. आसामच्या ३३ पैकी ३० जिल्ह्यांत ४६ लाख लोक संकटाचा सामना करत आहेत. आगामी २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.


केंद्राची आसामला २५१ कोटींची मदत, चेन्नईत दुसऱ्या दिवशी पाऊस
- आसामचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ९० टक्के बुडाले. युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ असलेले येथील शिकारप्रतिबंधक परिसर उद्ध्वस्त झाले आहे.
- मोरिगावात मदतकार्य करणारे ६५ वर्षीय सॅम्युअल, १०० वर्षांची आई व त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यात आले आहे. माझे सर्वात मौल्यवान एनआरसीचे कागद वाचले. त्याशिवाय आसाममध्ये राहता आले नसते.
- केंद्राने संकटावर मात करण्यासाठी २५१ कोटी रुपयांची मदत दिली. सोबत आवश्यक मदतही मिळेल.
- आसाममधील होऊ घातलेली क्रीडा स्पर्धा पुरामुळे पुढे ढकलण्यात आली. स्पर्धा १९ जुलैपासून सुरू होणार होती.
- नैसर्गिक संकटाशी झुंजणाऱ्या चेन्नईत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. मंगळवारी एक सेंमी पावसाची नांेद झाली. त्यामुळे शहराला उष्णतेपासून दिलासा मिळाला.
- नेपाळच्या ३१ जिल्ह्यांना पुराचा फटका. नेपाळच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पुरामुळे आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला. ३२ लोक बेपत्ता आहेत. प्रशासनाने ३ हजार ३६६ लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
flood situation worsens in Assam, Bihar rain