खून्नसने बघितल्याच्या कारणावरून 'त्या' युवकाचा खून

कराड येथील बाराडबरे परिसरात सोमवारी आदित्य बनसोडे या अल्पवयीन युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निघृण खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने तीन अल्पवयीन संशयितांना सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून आदित्यचा खून केल्याचे समोर येत आहे.

खून्नसने बघितल्याच्या कारणावरून 'त्या' युवकाचा खून
संग्रहित फोटो

प्राथमिक तपासात माहिती : तीन अल्पवयीन संशयित ताब्यात, पोलिसांकडून तपासाला गती 

कराड/प्रतिनिधी : 
           येथील बाराडबरे परिसरात सोमवारी आदित्य बनसोडे या अल्पवयीन युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निघृण खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने तीन अल्पवयीन संशयितांना सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून आदित्यचा खून केल्याचे समोर येत आहे. 
            याबाबत पोलिसांकडून मिळालेली अशी की, आदित्य बनसोडे हा बाराडबरे परिसर, कराड येथे राहत असून याच परिसरातील काही युवकांसोबत त्याची खुन्नस असल्याची माहिती समोर आली आहे. याच खुन्नसमुळे त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 
           दरम्यान, आदित्यचा खून करून घटनास्थळावरून पसार झालेल्या तीन संशयित आरोपींचा पोलीस तपास घेत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी तपासासाठी पोलीस पथकेही रवाना केली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने खूनप्रकरणी सोमवारी रात्री तीन संशयित अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील अधिक तपास करीत आहेत.