डिजिटल सातबारा आपल्या दारी योजनेचा उंब्रज येथे शुभारंभ

पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील,जिल्हाधिकारी शेखरसिंग यांची उपस्थिती

डिजिटल सातबारा आपल्या दारी योजनेचा उंब्रज येथे शुभारंभ
पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचे हस्ते डिजिटल सातबारा स्वीकारताना सरपंच योगराज जाधव

डिजिटल सातबारा आपल्या दारी योजनेचा उंब्रज येथे शुभारंभ

पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील,जिल्हाधिकारी शेखरसिंग यांची उपस्थिती

उंब्रज / प्रतिनिधी

शासनाच्या अनेक योजना असून त्यापैकी डिजीटल सातबारा ही योजना आपल्या दारी आली आहे.शनिवार दि.२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी या योजनेचा शुभारंभ महसूल विभागाच्या वतीने उंब्रज येथे करण्यात आला आहे.सर्व सामान्यांना सातबारा उतारा संबंधी अनेक अडचणी येतात. सातबारा लिहिण्यासाठी वेळ ही लागतो. या सर्वाचा विचार करून शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.याचा लाभ सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी केले.

उंब्रज ता.कराड येथे जिल्हाधिकारी सातारा, तहसिल कार्यालय कराड यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात डिजीटल सातबारा उताऱ्याचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे,तहसिलदार विजय पवार, सभापती प्रणव ताटे, जिल्हा परिषद सदस्या विनिता पलंगे, सरपंच माणिक जाधव, उंबज मंडलाधिकारी युवराज काटे,सुधाकर जाधव,यासह अन्य मान्यवर शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना डिजीटल सातबाराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ना.पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनी किमान वर्षाच्या मार्चमध्ये आपला सातबारा काढून तपासला पाहिजे. आपला शेती व्यवसाय हा पारंपारिक जरी असला तरी पूर्वजांपासून आलेल्या जमिनीबाबत काही प्रश्न निर्माण होऊ शकतात यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावाचे सातबारा डाउनलोड करत राहणार आहोत. त्याप्रमाणे घरपोच सातबारा प्रति काढून देणार आहोत. त्याचबरोबर ई पीक पाहणी नोंदणी करावी पिकांची नोंद करून घ्यावी यासाठी सर्वसामान्यांनी पाऊल उचलणे गरजेचे आहे. यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हवा आहे असे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सद्य परिस्थितीला २ लाख २७ हजार शेतकऱ्यांनी राज्यभरात नोंदणी केली आहे. आपलेही पहिलेच वर्ष असून जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यांसह नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा.सदरचा कार्यक्रम उंब्रज येथील शुभम थिएटर मध्ये पार पडला यासाठी कराड प्रांतअधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार,निवासी नायब तहसीलदार आनंदराव देवकर मंडलाधिकारी युवराज काटे व उंब्रज सर्कल मधील सर्व गावकामगार तलाठी व महसूल कर्मचारी यांनी परिश्रम घेतले