पळवून नेऊन लग्न केलेच्या कारणाने दोन गटांमध्ये मारामारी.

पळवून नेऊन लग्न केलेच्या कारणाने दोन गटांमध्ये मारामारी.

सातारा / प्रतिनिधी
 
वाठार स्टेशन (ता.कोरेगाव) येथे आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून बाजा र चौकामध्ये दोन गटांमध्ये जोरदार धुमचक्री झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी आज बाजारपेठ बंद ठेवली होती. काल सायंकाळी 5 वाजता राजेखान पठाण (वय 69) रा. वाठार स्टेशन व इस्माईल अदिल इनामदार, वय, 26 रा. फुलेनगर वाई अर्षद नईम शेख वय 25 रा. सातारा व एक अनोळखी इसम आणि प्रतीक काळोखे व गणेश घाडगे ( रा. वाठार स्टेशन) यांच्यात तलवारीने प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर सुमारे २०० तरुणांचा जमाव एकत्र आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत वाठार पोलीस ठाण्यात रात्री उशिरा परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून  पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती  पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी दिली. दरम्यान या घटनेची धार्मिक पार्श्वभूमी लक्षात घेत पोलिसांनी खबरदारी म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. सदरच्या 5 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना कोरेगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वाठार पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्वप्निल घोंगडे  साहेब करत आहे या घटनेमुळे आज वाठार स्टेशनमध्ये तणावपूर्ण शांतता होती. बाजारपेठ बंद ठेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. ग्राहक आणि व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.