शिवडे येथील तीन जणांविरोधात गुन्हा जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन

शिवडे ता.कराड येथे मुंबई, पुणे यासह सांगली जिल्ह्यातून आलेल्या ३ जणाविरोधात जिल्हा प्रवेश बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई शनिवार दि.११ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

शिवडे येथील तीन जणांविरोधात गुन्हा  जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन

उंब्रज / प्रतिनिधी

शिवडे ता.कराड येथे मुंबई, पुणे यासह सांगली जिल्ह्यातून आलेल्या ३ जणाविरोधात जिल्हा प्रवेश बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई शनिवार दि.११ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

 

राजेश आनंदराव भोसले (वय३९)रा. साकीनाका कुर्ला मुंबई,ओम राजेंद्र पवार (वय१९)रा.आदर्श पार्क सोसायटी वाघोली पुणे, संजय नंदू जानराव (वय२१)रा.उमडी ता.जत जि. सांगली सर्व रा.सध्या रा. शिवडे ता. कराड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशियत आरोपींची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांची माहिती, शिवडे ता.कराड येथे पुणे,मुबंई व सांगली जिल्ह्यातुन कारण नसताना तीन जण आल्याची माहिती उंब्रज पोलिसांना मिळाली होती.त्या अनुषंगाने पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अचानक वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी जाऊन संशियतांची माहिती घेतली असता त्यांच्याकडून जिल्हा प्रवेशाचा परवाना मिळून आला नाही. यावरून कोवीड-१९ च्या  अनुषंगाने जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना जाणीवपूर्वक माहिती न देता कोणतेही कारण नसताना सातारा जिल्ह्यात  प्रवेश करून आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास पोलीस नाईक युवराज पवार करीत आहेत.