क्रिकेट खेळणाऱ्या सहा जणांवर गुन्हा,मसूर येथील घटना

जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करून मसूर ता.कराड येथे क्रिकेट खेळणार्या सहा जनांवर उंब्रज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई शनिवार दि.२८ रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

क्रिकेट खेळणाऱ्या सहा जणांवर गुन्हा,मसूर येथील घटना

उंब्रज / प्रतिनिधी
जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करून मसूर ता.कराड येथे क्रिकेट खेळणार्या सहा जनांवर उंब्रज पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई शनिवार दि.२८ रोजी सायंकाळी ६.४५    वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

प्रथमेश उमेश बाचल (वय२५),सलमान मनसुर हकीम (वय२४),साहिल धस(वय२७),केतन बर्गे,तन्मय नंदकुमार बर्गे, ओंकार बर्गे सर्व रा. रा.मसूर ता.कराड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.

याबाबत पोलिसांची माहिती अशी,मसूर ता.कराड गावातील जेठाभाई उद्यानाचे मोकळे मैदानात संशयित एकत्र येऊन जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करुन तोंडाला मास्कचा वापर न करता कोरोना रोगाची तमा न बाळगता समाजातील इतर लोकांना धोका निर्माण होईल अशा रीतीने एकत्र जमुन क्रिकेट खेळत असताना मिळून आले यावरून सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.