लॉकडाउन मधील वीज बिलाबाबत खा.श्रीनिवास पाटील अलर्ट

लाॅकडाऊन मधील वाढीव वीज बिलाबाबत महावितरण'च्या कार्यकारी अभियंत्यांशी खासदार पाटलांनी केली चर्चा.

लॉकडाउन मधील वीज बिलाबाबत खा.श्रीनिवास पाटील अलर्ट

कराड / प्रतिनिधी

लाॅकडाऊन काळात वीज बिलाबाबत मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या तक्रारी आल्या त्याची दखल घेत खासदार श्रीनिवास पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत  माहिती घेतली.

कोरोना महामारीमुळे देशात लाॅकडाऊन सुरू आहे वीज वितरण कंपन्यांनी जून महिन्यामध्ये विज बिले दिली.  वाढून आलेल्या वीज बिलामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे विज बिल भरताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . "ग्राहकांच्या तक्रारींची दखल घ्या.  ज्यांच्या वीजबिलांमध्ये खरोखरच चूक आहे त्यांचे तक्रारीचे निवारण त्वरित करा." वीजबिल आकारणी प्रक्रिया मोठी किचकट असते, ती प्रक्रिया सामान्य ग्राहकाला समजावून सांगण्यासाठी ग्राहक संपर्क अभियानाची सुरुवात करा अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपविभागीय कार्यालय कराड महावितरण'चे कार्यकारी अभियंता श्री राख यांना केल्या. 

त्यावेळी श्री सारंग पाटील, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री नवाळे, श्री अमित आदमाने, श्री जालिंदर कुंभार श्री स्वप्नील जाधव, श्री सचिन माळी, श्री अमोल साठे उपस्थित होते.उपविभागीय कार्यालय कराड यांनी वीज ग्राहकांसाठी एक छापील निवेदन तयार केले आहे त्याची माहिती कार्यकारी अभियंता यांनी खासदार श्री पाटील यांना दिली.