म'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

केंद्र सरकारकडून होत असलेल्या सततच्या इंधन दरवाढीविरोधात महाबळेश्वरमध्ये शनिवारी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या अन्यायी विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध नोंदवला.

म'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक
महाबळेश्वर : इंधन दरवाढीचा निषेध नोंदवताना शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक

केंद्र सरकारच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी 

महाबळेश्वर/प्रतिनिधी : 
          केंद्र सरकारकडून होत असलेल्या सततच्या इंधन दरवाढीविरोधात  महाबळेश्वरमध्ये शनिवारी  शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या अन्यायी विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध नोंदवला. 
          यावेळी शिवसेना माजी जिल्हा अध्यक्ष गोपाळभाऊ वागदरे, शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, तालुका संघटक विजुभाऊ नायडू, संतोष जाधव, जेष्ठ शिवसैनिक नाना कदम, व धडाडीचे शिवसेना कार्यकर्ते शंकर ढेबे आदी. मान्यवर उपस्थित होते. 
           याप्रसंगी शिवसेनेचे सातारा जिल्हा माजी अध्यक्ष राजेश (बंडा) कुंभारदरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सध्या आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल स्वस्त झाले असतानादेखील भारतामध्ये मात्र पेट्रोल, डिझेलची शतकीय वाटचाल सुरू आहे. सरकारने उज्वल गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घरोघरी पोहचविले खरे. परंतु, सततच्या गॅस दरवाढीला वैतागून ग्रामीण भागातील शेतकरी व गरीब जनता पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळली आहे. 
          तसेच कोरोना महामारीने आगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना सतत इंधन दरवाढ करून केंद सरकारने भारतातील गोरगरीब जनतेची क्रूर चेष्टा चालविली आहे. अश्या तिखट शब्दांमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. त्याचबरोबर सरकारने ही पेट्रोल, डिझेलची  अन्यायी इंधन दरवाढ लवकरात लवकर मागे घ्यावी. अथवा होणाऱ्या परिणामांना  सामोरे जा, असा इशाराही त्यांनी यावेळी शिवसेनेच्या वतीने दिला आहे. महाबळेश्वरमध्ये शनिवारी पर्यटकांनी  मोठ्या प्रमाणात असलेल्या पर्यटकांनी देखील निषेध मोर्च्याच्या ठिकाणी गर्दी केलेचे पाहायला मिळाले.