उंब्रज येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील पाणीपुरवठा सुरळीत

दै.प्रीतिसंगमच्या बातमीची दखल

उंब्रज येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील पाणीपुरवठा सुरळीत

उंब्रज येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील पाणीपुरवठा सुरळीत

दै.प्रीतिसंगमच्या बातमीची दखल

उंब्रज/प्रतिनिधी

दै.प्रीतिसंगमने वार्ड क्र.६ मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला होता याबाबतचे सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर रोखठोक शब्दात ताशेरे ओढले होते.परंतु या वृत्ताची तातडीने दखल घेत ग्रामविकास अधिकारी व्ही एम चव्हाण यांनी दिवसरात्र एक करीत सदरचा पाणी प्रश्न निकालात काढला आहे.

यामुळे वॉर्ड क्र.६ मधील नागरिक दै.प्रीतिसंगमचे आभार व्यक्त करीत असून 'देर आये दुरुस्त आये'या म्हणी प्रमाणे ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकारी व्ही एम चव्हाण यांना सुद्धा धन्यवाद देत आहेत.

प्रीतिसंगमच्या परखड लेखणीमुळेच....

उंब्रजचे ग्रामविकास अधिकारी व्ही एम चव्हाण यांनी सदरचे काम पूर्ण झाल्याबाबत दै.प्रीतिसंगमच्या कार्यालयात स्वतः फोन करून सदरचे पाणीपुरवठा विभागाचे काम पूर्ण केल्याची माहिती दिली तसेच दै.प्रीतिसंगमच्या परखड आणि कठोर लेखणीच्या पाठपुराव्यामुळे दिवसरात्र मेहनत करून पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यात जिद्द निर्माण झाली आणि सदरचे काम मार्गी लागले.

व्ही एम चव्हाण

ग्रामविकास अधिकारी, उंब्रज