पृथ्वीराजबाबांनी घेतली टास्कफोर्सची ऑनलाईन बैठक

राज्यावर आलेल्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रूग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करत आहे. याचाच भाग म्हणून नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी तातडीने टास्कफोर्समधील 18 सदस्यांची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन बैठक घेतली. सर्व सदस्यांनी आपल्यासमोर लॅपटॉप ठेवून काही सुचना केल्या. तर त्यांना पृथ्वीराजबाबांनी मार्गदर्शन केले.

पृथ्वीराजबाबांनी घेतली टास्कफोर्सची ऑनलाईन बैठक

कराड/प्रतिनिधीः-
राज्यावर आलेल्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रूग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करत आहे. याचाच भाग म्हणून नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी तातडीने टास्कफोर्समधील 18 सदस्यांची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन बैठक घेतली. सर्व सदस्यांनी आपल्यासमोर लॅपटॉप ठेवून काही सुचना केल्या. तर त्यांना पृथ्वीराजबाबांनी मार्गदर्शन केले.
कोरोनाच्या संकटावर सरकारला साथ करायची आणि काही सुचना द्यायच्या याकरिता काँग्रेस पक्षाने टास्क फोर्सची निर्मिती केली. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये खा. राजीव सातव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुजफ्फर हुसेन, माजीमंत्री नसीम खान, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा, माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. संग्राम थोपटे, आ. रणजित कांबळे, कल्याणराव काळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेक्रेटरी अमोल देशमुख यांच्यासमवेत एकाच वेळी सर्वांना ऑनलाईन घेवून पृथ्वीराज बाबांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या विषाणूला रोखण्यासाठी आणि महाराष्ट्रावर आलेले संकट कसे दूर करता येईल. याबाबत सुचना घेतल्या. सुमारे ही बैठक दोन तास सुरू होती.
याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, आत्ता सध्या राज्यात व देशात संचारबंदी लागू आहे. सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सदस्य एकत्रित येवू शकत नाहीत. याकरिता लॅपटॉपच्या सहाय्याने पहिलीच बैठक पार पाडली आणि या बैठकीला सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी काही महत्वपूर्ण सुचनाही केल्या. एवढी चांगली बैठक होईल, असे मला अपेक्षित नव्हते. कदाचित ही बैठक मुंबई काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बोलवली असती तर काही सदस्य गैरहजर राहिले असते. मात्र, अशा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही बैठक पार पाडली आणि सुमारे दोन तास आमची ही बैठक सुरू होती. अशा अनेक बैठका जोपर्यंत लॉकडाऊन आहेत, तोपर्यंत घेतल्या जातील. आणि ज्या काही सुचना येतील त्याचा सर्व अहवाल आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पक्षाच्यावतीने सुपूर्त करू, असेही त्यांनी सांगितले.