एल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा

एल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा

एल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा 

 

वाई/दौलतराव पिसाळ

सातारा एलसीबीचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ व  पथकाने भुईंज येथे रात्र जागविली आणि बेपत्ता ओंकार चव्हाणचा खुन करुन त्याचा मृतदेह तेथीलच स्मशान भूमीत जाळुन पुरावा नष्ट करुन बिनधास्त पणे फिरणार्या चार आरोपींच्या मुसक्या आवळुन त्यांना ताब्यात घेण्यास यश आले आहे भुईंज सह वाई तालुक्यातील नागरीकांन कडुन कौतुकांचा वर्षाव  

  
सातारा एलसीबीचे कर्तव्य दक्ष आणी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात एक नंबर वर असणारे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ व त्यांच्या टिमने भुईंज कृष्णा पुला जवळ राहणार्या बेपत्ता ओंकार चव्हाणच्या खुणाला वाचा फोडण्या साठी रात्र जागवून काही तासातच वाचा फोडुन  चार आरोपी ताब्यात घेतले आहेत या धाडशी कारवाईचे  भुईंज परिसरा सह वाई तालुक्यातील नागरीकांनी कौतुक केले आहे ओंकार बेपत्ता असल्याचे वृत्त दै, प्रितीसंगमने प्रसिद्ध केले होते..


सविस्तर वृत्त असे कि सातारा पुणे महामार्गा वरील भुईंज येथील कृष्णा नदी पुला जवळ ओंकार कृष्णा चव्हाण वय ३० हा तरुण आपल्या आई वडीलांन सह राहत होता तो मोबाईल शॉपीचा व्यवसाय करत होता तो दि, ४| १ | २१ रोजी दुपारी ४|३० वाजण्याच्या सुमारास घरात असलेले वडील कैलास लक्ष्मण चव्हाण वय ५८ यांना मी पाचवडला जाऊन येतो असे सांगुन निघुन गेला होता तो परत घरी न आल्याने वडिलांनी सर्व नातेवाईकांन सह त्याच्या मित्रांन कडे चौकशी केली असता तो मिळुन न आल्याने अखेर त्यांनी दिं, ७ जानेवारी रोजी भुईंज पोलिस ठाण्यात मुलगा ओंकार हा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली या तक्रारीचीगंभीर दखल सातारा एलसीबीचे कर्तव्य दक्ष असलेले पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना
बेपत्ता ओंकारचा खुण झाला असावा अशी माहिती खास खबर्या मार्फत मिळाल्याने त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या टिमला मार्गदर्शन करुन भुईंज येथे पाठवले या टिमने काही तासातच गेल्या पाच दिवसा पासून बेपत्ता असलेल्या ओंकारचा शोध घेत असतानाच त्याचा चार तरुणांनी एकत्र येवुन त्याचे अपहरण करून  खुण करून तेथीलच  स्मशान भुमीत मृतदेह जाळुन पुरावा नष्ट केल्याची माहीती  एलसीबीच्या पथकाच्या हाती लागल्याने त्यांनी ते चारही आरोपींच्या मुसक्या आवळुन ताब्यात घेतले आहे या घटने  मुळे भुंईज सह वाई तालुक्यात खळबळ ऊडाली आहे या खुणाला वाचा फोडल्या बद्दल एलसीबीचे भुईंज सह वाई तालुक्यातील नागरीकांनी  या धाडसी  कामगिरीचे कौतुक केले आहे