गोमांस वाहतूक करणारी बोलेरो वाठार पोलिसांच्या जाळ्यात

वाठार स्टेशन येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो आणि दोन आरोपींसह पकडून वाठार पोलिसच्या ताब्यात दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे... 2 हजार 500 किलो गोमांसची वाहतूक लॉकडाऊनचे उल्लंघन करून होतेच कशी....?... असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे....

गोमांस वाहतूक करणारी बोलेरो वाठार पोलिसांच्या जाळ्यात

वाई / दौलतराव पिसाळ 

फलटण पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून चकवा देत जनावरांच्या मांसाची ची राजरोज पणे टेम्पो मधून खुलेआम पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विनापरवाना वाहतूक करत असलेल्या टेम्पोला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून महादेव शिवाजी कुंभार या चालकासह अक्षय बाळासो कुंभार या साथीदारांसह मांसासह वाठार पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे लॉकडाऊन चा कालावधी असतांना देखील हे सगळं कसं घडत आहे. असे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. व नियम पाळणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


  वाठार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्यकर्ते असलेले यांना दि. 22 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार शुवम शामराव चव्हाण वय.22 व्यवसाय हॉटेल चालक रा. वाठार स्टेशन तालुका कोरेगाव यांना सर सेनापती हंबीराव मोहिते गोशाळा वडकी ता. पुरंदर जिल्हा पुणे येथून गोरक्षक निखिल दरेकर यांनी फोनवरून माहिती दिली की दिनांक 23/05/2021 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पिकप क्रमांक MH.42.AQ.2019 मधून फलटण येथून गोमांस भरून पुणे येथे वाठार मार्गे खेड शिवापूर कड जाणार असल्याची माहिती मिळाल्याने आज पहाटे तीन वाजल्या पासून तक्रारदार शिवम चव्हाण व त्याचे मित्र निखिल कानडे, जितेंद्र लोंढे, निलेश भोसले, ऋषिकेश गायकवाड, सौरभ जाधव, रोहन गायकवाड, हर्षद जाधव असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आदर्की फाटा येथे थांबून गोमांस भरून येणाऱ्या पिकप ची वाट पाहत बसले होते त्या दरम्यान फलटण बाजूकडून वाठार बाजूकडे पिकप क्रमांक MH.42.AQ.2019 भरधाव वेगात येत असताना वरील उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी आदर्की फाटा येथे पिकप थांबवण्याचा प्रयत्न केला असता परंतु पिकप चालकाने समोर कार्यकर्ते पाहताच पिकप अधिक वेगाने न थांबवताच पुढे पळवत घेऊन गेला वरील कार्यकर्त्यांनी त्या पिकअपचा सिने स्टाईल पाटलाग दुचाकी वरून सुरू केला त्यावेळी ही पिकप वाठार स्टेशन येथील एका चौकांमध्ये पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या कार्यकर्त्यांना टेम्पो पकडण्यात यश आले. या कार्यकर्त्यांनी टेम्पो चालक महादेव शिवाजी कुंभार वय.25 व्यवसाय ड्रायवर राहणार देशमुख वाडी तालुका. माळशिरस जिल्हा सोलापूर व सहकारी मित्र असलेला अक्षय बाळासो कुंभार वय.22 रा.आसू ता.फलटण या दोघांना टेम्पो मध्ये काय आहे असे विचारले असता त्यांनी कलिंगड भरलेले आहे. असे सांगितले पण वरील कार्यकर्त्यांनी पिकप ची पाहणी केली असता त्यांना त्यामध्ये मांस दिसून आल्याने त्यांनी तात्काळ जवळ असलेल्या वाठार पोलिस ठाण्याशी या गंभीर घटनेची फोनवरून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हवलदार चव्हाण व हवलदार चोरट असे दोघे जण पोलिस गाडी सह उभ्या असलेल्या टेम्पो जवळ आले व त्यांनी मांस वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने परवाना नसल्याची माहिती दिली. हे मांस कुठून आणले असे विचारले असता चालक महादेव कुंभार यांनी हे मांस गुलाब शेख राहणार आसू ता.फलटण याने टेम्पोमध्ये भरून टेम्पो फलटण येथील मुधोजी हायस्कूल जवळ आणून दिला होता असे त्याने पोलिसांना सांगितले या टेम्पो मध्ये 2 हजार 500 किलो इतके गाईंचे व बैलांचे कत्तल करून त्याचे मांस वाहतुकीला नेले जात आहे. अशी माहिती टेम्पो चालकाने पोलिसांना दिली. हे मांस टेम्पोमध्ये भरून फलटण ते पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या खेड शिवापुर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.या घटनेची तक्रार शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्यकते असलेले वाठार स्टेशन येथील शिवम शामराव चव्हाण वय.22 रा. वाठार स्टेशन ता. कोरेगाव यांनी वाठार पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. याचा अधिक तपास वाठार पोलिस करीत आहेत...