नटराज मंदिर परिसर खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी,२४ तासात संशयित ताब्यात 

नटराज मंदिर परिसर खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

नटराज मंदिर परिसर खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी,२४ तासात संशयित ताब्यात 

सातारा एलसीबीच्या पथकाने पुणे परिसरात केलेल्या  धडाकेबाज छापे मारीत वाईच्या खून प्रकरणातील ३ अल्पवयीन फरार असलेला  संशयित आरोपींना २४ तासाच्या आत ताब्यात घेतल्याने सातारा एलसीबीचे सर्व थरातुन कौतुक होत आहे .

वाई / दौलतराव पिसाळ .

वाई शहरातील रहिवासी असलेला अर्जुन मोहन यादव वय २५ याचा अज्ञात मारेकर्यांनी गोळ्या घालून दि. २ रोजी खुन केला होता.घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले होते त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्तव्यदक्ष सपोनि रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, शरद बेबले, पोलिस नाईक फडतरे, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहीत निकम, प्रमोद सावंत यांच्या पथकाला आरोपी शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले होते .या पथकाने सातारा जिल्ह्यातील भुईंज कोरेगाव पुसेगाव या ठिकाणी या पथकाने धाडी टाकल्या होत्या पण त्या ठिकाणी काहीच न सापडल्याने या पथकाने तपासाची दिशा बदलून मोर्चा पुण्याच्या दिशेने बदल्याने टाकलेल्या धाडीत ३ अल्पवयीन आरोपींना गजाआड करण्यात या पथकाला अखेर यश आले आहे इतर २ आरोपींना लवकरच गजाआड करणार असलेचा विश्र्वास या पथकाने व्यक्त केला आहे . 

सातारा येथील बॉम्बे रेस्टारॅट चौक परिसरातील नटराज मंदीरातुन देव दर्शन करुन बाहेर आल्यावर त्या ठिकाणी दुचाकी वरुन आलेल्या  दोन अज्ञात तरुणांनी त्याच्या डोक्यात पिस्तूलच्या साह्याने जवळुन दोन गोळ्या झाटल्याने अर्जुन यादव हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला पण मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्याला हादरा बसला होता.या गंभीर घटनेची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अजीत बोऱ्हाडे एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ व इतर पोलिसांनी घटना स्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून एलसीबीचे खास पथक तयार करुन आरोपींचा तातडीने शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते .