शिक्षकांसाठी या शाळेने घेतले ऑक्सिजन मशिन

कराड शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून शहरात बेड व ऑक्सिजनची  कमतरता भासत आहे. अशापरिस्थितीत शिक्षकांसह कुटुंबियांच्या आरोग्याची घेणार काळजी घेण्यासाठी कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 ने 26 हजार रुपयांचे ऑक्सिजन मशिन खरेदी केले आहे.

शिक्षकांसाठी या शाळेने घेतले ऑक्सिजन मशिन

कराड न. पा. शाळा क्र. 3 चा उपक्रम : शिक्षकांसह कुटुंबियांच्या आरोग्याची घेणार काळजी

कराड/प्रतिनिधी :
          कराड शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून शहरात बेड व ऑक्सिजनची  कमतरता भासत आहे. अशापरिस्थितीत शिक्षकांसह कुटुंबियांच्या आरोग्याची घेणार काळजी घेण्यासाठी कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 ने 26 हजार रुपयांचे ऑक्सिजन मशिन खरेदी केले आहे.
         कोरोनाच्या प्रादुर्भावात दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन व बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता कराड पालिकेच्या शाळा क्र. 3 ने शाळेतील शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची घेणार काळजी घेण्यासाठी हे ऑक्सिजन मशिन खरेदी केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी सांगितले.