अश्विनी रुग्णालय व बिपिन पटेल यांचेविरुध्द पोलिसांत तक्रार

अश्विनी रुग्णालय व बिपिन पटेल यांचेविरुध्द पोलिसांत तक्रार

सोलापुर/महेश गायकवाड

येथील सुप्रसिद्ध असलेले अश्विनी सहकारी रुग्णालयाने पैशाच्या अमिषाने कोरोना पॉज़िटिव्ह रुग्णांस अड्मिट करून घेतले व याची कसलीच माहिती जिल्हा प्रशासनास दिली नाही. तसेच कोरोना सदृश रुग्ण अड्मिट करून घेतल्यानंतर कोणतीही दक्षता न घेता त्यांचेवर उपचार चालू केले. त्या कोरोना पॉज़िटिव्ह व्यक्तीव्दारे संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रसार व फैलाव झाला, आणि त्या रुग्णालयामुळे 5-6 व्यक्तीचा मृत्यूही झालेला आहे. मी घेतलेली विश्वसनीय माहिती, बातम्या, सरकारी स्टेटमेंट व कोरोना रुग्णांची अचानक वाढलेली आकडेवारी बघितल्यास अश्विनी रुग्णालयाने कोरोनो बाधित व्यक्तीच्याव्दारे मानवी देहातून सोलापुरच्या जनतेत कोरोना विषाणुचा जाणीवपूर्वक फैलाव व प्रसार करून अश्विनी रुग्णालयाने व्यवसाय वाढीच्या दृष्ट हेतूने कोरोना विषाणूचा प्रसार करून जवळपास 5-6 व्यक्तीचा जीव घेवून व अंदाजे 50-60 नागरिकावर जीवघेणा कोरोना विषाणूची लागण केल्याप्रकरणी अश्विनी सहकारी रुग्णालय प्रशासन व प्रमुख पदाधिकारी बिपिन पटेल यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबतची लेखी तक्रार छावाचे योगेश पवार यानी सदर बझार पोलिसांकडे ऑनलाईन केली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की., सोलापूर शहर व जिल्ह्यातील तसेच शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी महत्त्वाचे समजले जाणारे अश्विनी सहकारी रुग्णालयामधील काही कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असून काही जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहे. अश्विनी रुग्णालयाने काही दिवसांपूर्वी कोणतीही दक्षता न घेता, जास्त फी व पैशाच्या अमिषाने कोरोना पॉज़िटिव्ह रुग्णांस हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. त्या रुग्णांमुळे व त्यांच्या संपर्कामुळे हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी व तिथे अड्मिट असलेल्या अन्य रुग्णांना असे मिळून अंदाजे 50-60 व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली असून 5-6 व्यक्तीचा मृत्यूही झालेला आहे. कोणतीही सुरक्षा व दक्षता न घेता, आरोग्यसेवेचे नियम जाणीवपूर्वक डावलून हॉस्पिटलने बाधित रुग्णांची माहिती जिल्हा प्रशासनास दिली नाही. त्यामुळे रुग्णालयातील एका गर्भवतीस व तिच्या नवजात बालकांचा ही मृत्यु झाला. तसेच त्यावेळी सदर रुग्णालयात अन्य रुग्णांसह, नवजात शिशु व प्रसूती झालेल्या महिलांची संख्या अधिक होती. त्यामुळे त्या सर्वांना कोरोना ची लागण होण्याची शक्यता निर्माण झालेली असून त्यातले बहुतांश लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने अश्विनी रुग्णालय हे सोलापुरात कोरोनाचा प्रसार करणारे 'सुपरस्प्रेडर' ठरले आहे. "सोलापुरात सध्या 153 कोरोनाचे रुग्ण आहेत, आणि गेल्या सात - आठ दिवसांत हा आकडा सातत्याने वाढत आहे. ही वाढ प्रामुख्याने अश्विनी रुग्णालय प्रशासन व प्रमुख पदाधिकारी बिपिन पटेल यांच्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे," असं पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यानी न्यूज चेनेल, सोशल मीडिया व यु ट्यूब सारख्या सोशल मीडियावरील बातम्यामध्ये  दि. 06 मे 2020 रोजी सांगितलेलं आहे.
कोरोना विषाणु व या महारोगाची लागण व प्रसार होवून नये, यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून कोरोना सदृश रुग्णांस खाजगी हॉस्पिटलमध्ये अड्मिट करून घेतल्यास त्याची माहिती तातडीने जिल्हा प्रशासनाला देण्याचा नियम असताना सुध्दा पैसे कमाविण्याच्या दृष्ट हेतूने अश्विनी रुग्णालय प्रशासनाने कोरोना पॉज़िटिव्ह रुग्ण अड्मिट करून घेतला. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवून कोरोना विषाणुचा फैलाव व प्रसार केला अश्विनी रुग्णालयाचा हा निष्काळजीपणा बघितल्यावर त्यांच्या हेतूविषयीच दाट संशय येतोय.? म्हणूनच अश्विनी रुग्णालयाने जाणीवपूर्वक कोरोना विषाणुचा प्रसार केला याला पुष्टी मिळते. तसेच अश्विनी रुग्णालयामुळे जनतेला कोरोना विषाणुची जास्तीतजास्त लागण होत आहे. त्यांच्यामुळे सोलापुरातील नागरिकांचे कधीच न भरून येण्यासारखे आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान झालेले असून काही प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. अश्विनी सहकारी रुग्णालय प्रशासन व प्रमुख पदाधिकारी बिपिन पटेल यांचेविरुद्ध भा.दं.वी.चे कलम 188, 269, 270, 271, 290, 336, सह 34, साथरोग प्रतीबंध अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4, महाराष्ट्र कोवीड 19 उपाययोजना 2020 चे नियम 11 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब), कलम 144 सीआरपीसी प्रमाणे गुन्हा दाखल करून रुग्णालयाशी संबंधित व कोरोना बाधित व्यक्तींना त्वरित स्थानबध्द करण्याची मागणी  योगेश पवार यानी केलली आहे.