Terror Funding: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदसह 12 दहशतवाद्यांवर पाकिस्तानात खटला दाखल

लाहोर - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदविरोधात पाकिस्तानात खटला दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने 3 शहरांत हाफिज आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध 23 एफआयआर दाखल करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादविरोधात प्रबळ कारवाई केली नाही तर निर्बंध लावू असा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या देशातील सर्वात कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या म्हुस्क्या आवळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.पाकिस्तानच्या काउंटर टेररिज्म डिपार्टमेंटने जारी केलेल्या माहितीनुसार, जमात-उद-दावा आपल्या जवळच्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवतात. यासाठी जमातकडून 5 वित्तीय संस्थांचा वापर केला जातो. हाफिज सईद हाच जमातचा म्होरक्या आहे. पाकिस्तानने लाहोरसह तीन शहरांत 23 एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्यामध्ये लश्कर-ए-तोयबासह फलाह-ए-इंसानियतच्या सदस्यांचा समावेश आहे.हाफिज सईद ठिक-ठिकाणी सभा संमेलने घेऊन दहशतवाद्यांसाठी पैसा गोळा करतो. आणि आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांना पाठवतो असे तपासातून समोर आले आहे. या ट्रस्टमध्ये अल-अनफाल, दावत-उल-इरशाद, अल हमद, अल मदीना आणि मौज बिन जबल यांचा समावेश आहे. या सर्वच प्रकरणांची सुनावणी दहशतवादविरोधी कोर्टात केली जाणार आहे. विशेष म्हणजे, 26 सप्टेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईदला अमेरिकेने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. तरीही पाकिस्तानात तो मोकाट फिरत आहे. पाकिस्तान आतापर्यंत या कुख्यात दहशतवाद्याला धर्मगुरू म्हणत आला आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today 23 fir against mumbai terror attack mastermind hafiz saeed and associates in pakistan


 Terror Funding: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदसह 12 दहशतवाद्यांवर पाकिस्तानात खटला दाखल

लाहोर - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदविरोधात पाकिस्तानात खटला दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने 3 शहरांत हाफिज आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध 23 एफआयआर दाखल करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादविरोधात प्रबळ कारवाई केली नाही तर निर्बंध लावू असा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या देशातील सर्वात कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या म्हुस्क्या आवळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


पाकिस्तानच्या काउंटर टेररिज्म डिपार्टमेंटने जारी केलेल्या माहितीनुसार, जमात-उद-दावा आपल्या जवळच्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवतात. यासाठी जमातकडून 5 वित्तीय संस्थांचा वापर केला जातो. हाफिज सईद हाच जमातचा म्होरक्या आहे. पाकिस्तानने लाहोरसह तीन शहरांत 23 एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्यामध्ये लश्कर-ए-तोयबासह फलाह-ए-इंसानियतच्या सदस्यांचा समावेश आहे.


हाफिज सईद ठिक-ठिकाणी सभा संमेलने घेऊन दहशतवाद्यांसाठी पैसा गोळा करतो. आणि आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांना पाठवतो असे तपासातून समोर आले आहे. या ट्रस्टमध्ये अल-अनफाल, दावत-उल-इरशाद, अल हमद, अल मदीना आणि मौज बिन जबल यांचा समावेश आहे. या सर्वच प्रकरणांची सुनावणी दहशतवादविरोधी कोर्टात केली जाणार आहे. विशेष म्हणजे, 26 सप्टेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईदला अमेरिकेने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. तरीही पाकिस्तानात तो मोकाट फिरत आहे. पाकिस्तान आतापर्यंत या कुख्यात दहशतवाद्याला धर्मगुरू म्हणत आला आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
23 fir against mumbai terror attack mastermind hafiz saeed and associates in pakistan