बेलवडे बुद्रुक येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

स्व. यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्यकारिणी समितीतर्फे बेलवडे बुद्रुक येथे लायन्स चॅरिटेबल आय ट्रस्ट व लायन्स क्लब, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शोध मोहीम व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.

बेलवडे बुद्रुक येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

कराड/प्रतिनिधी : 

                        स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या जन्मशताब्दी कार्यकारिणी समितीमार्फ़त बेलवडे बुद्रुक येथे लायन्स चॅरिटेबल आय ट्रस्ट व लायन्स क्लब कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतिबिंदू शोधमोहिम व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यशवंतराव मोहिते कृष्णा सह. साखर कारखाना उस उत्पादक सभासद बंधू-भगीनींसाठी या मोतिबिंदू शोधमोहिम व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सभासद, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. 

                        येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शुक्रवारी 29 रोजी दुपारी हे शिबीर घेण्यात आले. भारती विद्यापीठ, पुणेचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या उपस्थित व यशवंतराव मोहिते पतसंस्थेचे संचालक मारुती मोहिते (आबा), शिवजीराव मोहिते (आप्पा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 

                       यावेळी जयवंतराव मोहिते (दादा), सातारा जिल्हा बँकेच्या बेलवडे शाखेचे मँनेंजर जगदानी साहेब, जयवंतराव मोहिते (दादा), लालाकाका मोहिते, डॉ. संजय मोहिते, प्रकाश माने, संभाजी मोहिते ,जगन्नाथ मोहिते, संजय पटेल, यशवंतराव मोहिते नागरी सह. पतसंस्थेचे शाखाप्रमुख सागर मोहिते, दिनकर मोहिते (आप्पा) व इतर कारखाना सभासद उपस्थित होते. 

                       या शिबिरात कारखान्याचे सभासद व ग्रामस्थांची मोतिबिंदू तपासणी करण्यात आली. तसेच मोतीबिंदू झालेल्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार येणार असल्याची माहिती डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी दिली. या शिबिरास कारखान्याचे सभासद व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला असून शिबिरामध्ये 30 ते 40 रुग्णांची तपासणी करण्यात आली.