ब्रह्मदास पतसंस्थेच्या चेअरमनपदी मारूती मोहिते

ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानुसार संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीही नुकत्याच बिनविरोध संपन्न झाल्या. यामध्ये चेअरमनपदी मारूती मोहिते व व्हाईस चेअरमनपदी महादेव मोहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

ब्रह्मदास पतसंस्थेच्या चेअरमनपदी मारूती मोहिते
फोटो : चेअरमन मारूती मोहिते व व्हा. चेअरमन महादेव मोहिरे यांचा सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.आर. मोरे. समवेत, सर्व संचालक व सभासद.

ब्रह्मदास पतसंस्थेच्या चेअरमनपदी मारूती मोहिते

‌व्हा. चेअरमनपदी महादेव मोहिरे : बिनविरोध निवडी संपन्न, सभासद, ठेवीदार, हितचिंतकांकडून अभिनंदन

कराड/प्रतिनिधी : 

   बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानुसार संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीही नुकत्याच बिनविरोध संपन्न झाल्या. यामध्ये चेअरमनपदी मारूती मोहिते व व्हाईस चेअरमनपदी महादेव मोहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

   संस्थेच्या प्रधान कार्यालयात गुरुवारी रोजी सकाळी चेअरमन मारूती मोहिते व व्हाईस चेअरमन महादेव मोहिरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.आर. मोरे, सर्व संचालक व सभासद वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी, संस्थेने निवडणूक बिनविरोध करून सहकार क्षेत्रात एक आदर्श पायंडा पाडला असल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले.

   संस्थेच्या नवीन संचालक मंडळामध्ये चेअरमन मारुती मोहिते (आबा), व्हाईस चेअरमन महादेव मोहिरे यांच्यासह संचालक संस्थापक अध्यक्ष वसंतराव मोहिते (सर), जयवंतराव मोहिते (दादा), यशवंत मोहिते, शंकरराव मोहिते, संपतराव मोहिते, दिलीप मोहिते, राजेंद्र पाटील, पल्लवी मोहिते, वत्सला मोहिते, महेंद्र कांबळे, लक्ष्मण मदने यांचा समावेश आहे.

   दरम्यान, महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार 30 मे 2022 रोजी तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक सहकारी संस्था, कराड यांनी ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा सन 2022-23 ते 2026-27 सालाकरीता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकीसाठी 3 जून 2022 रोजीपर्यंत उमेदवारी अर्जाची अंतिम यादी जाहीर करण्याची मुदत होती. त्यानुसार अर्जाची अंतिम यादी जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 3 जून रोजी एकूण 13 जागांसाठी 13 जणांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले.

   त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग 8, महिला राखीव 2, इतर मागास वर्ग राखीव 1, अनुसूचित जाती-जमाती राखीव 1, भटके-विमुक्त राखीव 1 असे एकूण 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.आर. मोरे यांनी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

   ब्रम्हदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने सभासद हिताला प्राधान्य दिल्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानुसार पाच वर्षासाठी संस्थेच्या नवीन संचालक मंडळाची नियुक्ती झाली असून नवनियुक्त संचालक मंडळाला सर्वोत्तम काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्धल संस्थेचे आजी-माजी संचालक, सर्व सभासद, ठेवीदार, ग्रामस्थ व हितचिंतकांनी संस्थेच्या नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

   प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक उमेश पाटील यांनी केले. तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, हितचिंतक, सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मोहिते (सर) यांनी आभार मानले.ब्रह्मदास पतसंस्था नेहमीच सभासद, ठेवीदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहे. संस्थेच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत संस्थेने सभासद, ठेवीदारांना नेहमीच आपुलकीची वागणूक दिली. संस्थेतील ठेवी व मुदतपूर्व कर्जफेड हीच याची खरी परतफेड असून संस्थेच्या यशाचा आलेख अधिकाधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. 


   - मारुती मोहिते (चेअरमन, ब्रह्मदास ग्रा.बि.शेती.सह. पतसंस्था, बेलवडे बुद्रुक).