एंजल्समध्ये स्काऊट गाईड स्थापना दिवस साजरा

एंजल्समध्ये स्काऊट गाईड स्थापना दिवस साजरा


कराड/प्रतिनिधीः
कराड जनता चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विरवडे ता. कराड येथील एंजल्स इंटरनॅशनल स्कुलमध्ये स्काऊ ट-गाईट स्थापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्काऊ ट चळवळीचे संस्थापक बेडन पॉवेल व सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालयाचे प्राचार्य जहांगीर सिकंदर आतार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर विश्वस्त सौ ॠतुजा पाटील. मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत राजेश पाटील वाठारकर व सौ ॠतुजा पाटील यांनी केले. यानिमित्त शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 
या कार्यक्रमानिमित्त स्काऊ ट गाईट चळवळभ् विषयीची माहिती क्रिडाशिक्षक स्काऊ ट मास्टर संतोष डांगे यांनी दिली. आभार गाईट कॅप्टन प्रिती चव्हाण यांनी मानले.